क्रिकेटर जसप्रीत बुमराह या स्पोर्ट्स अ‍ॅंकरसोबत गोव्यात घेणार सात फेरे?

क्रिकेटर जसप्रीत बुमराह या स्पोर्ट्स अ‍ॅंकरसोबत गोव्यात घेणार सात फेरे?
Cricketer Jasprit Bumrah to marry sports anchor Sanjana Ganesan at Goa

मुंबई: भारतातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच रंगतांना दिसत आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांचे लग्न होणार आहे ही बातमी व्हायरल होताच चाहते त्यांची नववधू कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले. सट्टेबाजीचे बाजार चांगलेच तापले आहे. अंदाज लावणे सुरू झाले आहे. अगदी दक्षिणेतील एका अभिनेत्रीच्या कुटुंबाला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. आता ताज्या माहितीनुसार बुमराहच्या होणाऱ्या बायकोच्या नावासह लग्नाची तारीख व ठिकाणही सांगितले जात आहे.

स्पोर्ट्सकिडा या वेबसाइटच्या ताज्या अहवालात असा दावा केला जात आहे की बुमराह 14-15 मार्च रोजी गोवा येथे स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनबरोबर सात फेरे घेणार. मात्र अद्याप दोन्ही बाजूंकडून या गोष्टीला समर्थन किंवा नाकार दिला गेला नाही. कोविड प्रोटोकॉल अंतर्गत, फक्त जवळचे मित्र आणि निवडक नातेवाईक या कार्यक्रमात सहभागी होतील. असे म्हटले जात आहे.

प्रोफेशनल जीवना व्यतिरीक्त ते दोघे कधीही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नाहीत. किंवा यापूर्वी कोणत्याही मीडिया रिपोर्टमध्ये या दोघांचे प्रेमसंबंध उघड झाले नाहीत. हे जर खरेच सिद्ध झाले तर दोघांनाही आपले नाते लपवून ठेवण्यात यश मिळवले असे मसजले जाईल. सोशल मीडियावरही या दोघांचे चाहते आपआपल्या पद्धतीने या दोघांचे अभिनंदन करतांना दिसत आहेत.

संजना गणेशन 28 वर्षाची एक क्रिकेट अँकर/प्रेझेंटर आहे. ती मागील काही काळ बर्‍याच स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. आयपीएलमध्ये सक्रिय राहण्याबरोबरच ती स्टार स्पोर्ट्सशीही जुळलेली आहे. संजनाने आयसीसी वर्ल्ड कप 2019 पासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये होस्ट केले आहे. याशिवाय संजना कोलकाता नाईट रायडर्सची अँकरही होती. संजनाने 2013 मध्ये फेमिना भव्य पदक जिंकले होते.

तीने एमटीव्हीच्या रिअ‍ॅलिटी शो स्पिलिट्स व्हिलामधून टीव्हीमध्ये पदार्पण केले. संजनाने पुणे येथील प्रसिद्ध विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये देखील आपली नशीब आजमावले आणि 2014 मध्ये ती मिस इंडियाच्या अंतिम सामन्यात देखील पोहोचली होती.

यापूर्वी बुमराह साऊथची अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनशी लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पुढाकार घेवून ही अफवा असल्याचे सांगितले होते. कुटुंबीयांनी सांगितले की अनुपमा सध्या गुजरातमध्ये आहे आणि तिच्या शूटमध्ये व्यस्त आहे. त्याचवेळी अनुपमाच्या आईने सांगितले की ही केवळ अफवा आहे. कुटुंब त्याकडे फारसे लक्ष देत नाही.

यापूर्वी जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयला रजा मागितली होती. तो चौथ्या कसोटीत खेळला नव्हता, तेव्हापासून जसप्रीत बुमराह लवकरच लग्न करणार आहे अशी बातमी माध्यमात पसरली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्यावतीने कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही. 12 मार्चपासून भारत-इंग्लंड दरम्यान पाच सामन्यांची टी -20 मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com