संबंधित बातम्या
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसातसा सगळ्या ...


पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. आणि त्यानुसार राज्यातील...


क्रिकेटर मनोज तिवारीने तृणमूल कॉंग्रेसच्या पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे.
हुबळी: आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये निवडणूका होणार आहेत. लवकरच विधानसभा निवडणूकांच्या तारखाही जाहीर होतील. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात राजकिय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना हुबळीमध्ये झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या सभेत क्रिकेटर मनोज तिवारीने तृणमूल कॉंग्रेसच्या पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे. यापूर्वी माजी क्रिकेटर सौरभ गांगुलीची भाजपमधील प्रवेशावरुन बंगालच्या राजकारणात चर्चा सुरु झाली होती. मात्र अद्याप तरी सौरभ गांगुलीच्या पक्षप्रवेशाबद्दलची चर्चा गुलदस्त्यातच आहे.
INDvsENG : तिसऱ्या डे नाईट सामन्यात कोण ठरणार वरचढ? गौतम गंभीरनेच दिले याचे...
A new journey begins from today. Need all your love & support. From now onwards this will be my political profile on Instagram.https://t.co/uZ9idMW7lD
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) February 24, 2021
बंगालच्या आगामी विधानसभा निवडणूकात क्रिकेटर मनोज तिवारीला तृणमूल कॉंग्रेसकडून विधानसभा तिकिट मिळणार असल्याची चर्चाही रंगली आहे. एका स्टार प्रचारकाची एन्ट्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षात झाली असल्यामुळे त्यांच्या पक्षाला फायदा होणार असल्याचा तर्क राजकिय विश्लेषक लावत आहेत. मनोज तिवारीने 2008 मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. तर त्याने शेवटचा सामना 2015 खेळला होता. आयपीएलमध्येही त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते.
तृणमूल पक्षातील पक्षप्रवेशावरुन मनोज तिवारीने ट्विट करुन बंगालच्या जनतेकडून पाठिंब्याचे आवाहन केले आहे. ‘’आज पासून माझा नवा प्रवास सुरु होत आहे. आणि त्यासाठी मला सर्वांचा पाठिंबा आणि प्रेम हवयं’’, असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Cricketer Manoj Tiwary to join TMC today at West Bengal Chief Minister Mamata Banerjee's rally in Hooghly
(file photo) pic.twitter.com/cmYCTd67ZS
— ANI (@ANI) February 24, 2021