41, 44 की 46 शाहिद आफ्रिदीचा नेमका वाढदिवस कितवा...?ट्विटनंतर पेटला नवीन वाद

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

शाहिद आफ्रिदीने आपला वाढदिवस 1 मार्च रोजी म्हणजेच आज साजरा केला. याबद्दल  या क्रिकेटरच्या ट्विटनंतर एक नवीन वाद पेटला.

नवी दिल्ली: शाहिद आफ्रिदीने आपला वाढदिवस 1 मार्च रोजी म्हणजेच आज साजरा केला. याबद्दल अष्टपैलू खेळाडूंने ट्विटरवरून सर्वांचे आभार मानले. मात्र, या क्रिकेटरच्या ट्विटनंतर एक नवीन वाद पेटला. आफ्रिदीने दावा केला की तो 44 वर्षांचा आहे.

अनेक वेबसाइटवर शाहिद आफ्रिदीचे वय 41 वर्षे सांगितले जात आहे. यानंतर या माजी पाकिस्तानी कर्णधाराचे खरे वय काय आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. त्याचा खरा वाढदिवस कोणत्या दिवशी आणि कोणत्या साली आहे याबद्दल लोक अधिकच संशयी झाले आहेत कारण त्याने स्वत: च्या चरित्रामध्ये जन्म वर्ष वेगळे सांगितले आहे. त्याचे 'गेम चेंजर' पुस्तक 2019 मध्ये प्रसिद्ध झाले. शाहिद आफ्रिदी यांनी दावा केला आहे की त्यांचे जन्म वर्ष 1980 चे नव्हे तर 1975 चे आहे. त्याचे पूर्वीचे जन्म वर्ष 1980 असे मानले जात होते. याचा अर्थ असा आहे की आफ्रिदी 46 वर्षांचे आहेत 44 वर्षांचे नाही. असे त्याने केलेल्या ट्विटनुसार म्हटले जात आहे.

आयपीएल 2021 मध्ये उडाली खळबळ! प्रीती झिंटाच्या टीमने विचारला बीसीसीआयला जाब 

आफ्रिदीच्या वाढदिवशी बर्‍याच लोकांनी त्याला ऑनलाईन ट्रोल केले. काहींनी अभिनंदन केले तर काहंनी ट्रोल केले. काही चाहत्यांनी शाहिद आफ्रिदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि बरेच लोकं त्याच्या जन्माच्या वर्षाबद्दल आश्चर्यचकित झाले. अनेक चाहत्यांनी हा प्रश्न विचारला की आफ्रिदीच्या वयाविषयीच्या नोंदींचे काय होईल? बर्‍याच लोकांनी आफ्रिदीच्या 41 वर्षीय वयाचे स्क्रीनशॉट सामायिक केले आहेत. बर्‍याच लोकांनी असेही म्हटले की दरवर्षी आफ्रिदीच्या वाढदिवशी त्याचे वय चर्चेचा विषय बनते.

जर्मनी ते युक्रेन पर्यंत भारतीय खेळाडूंचा डंका; सचिनही म्हणाला... 

 

संबंधित बातम्या