विराट आणि अनुष्काने पूर्ण केली 1095ची 'पार्टनरशिप'; लवकरच देणार खुशखबर

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आज आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत. विराट कोहलीने यानिमित्त अनुष्कासाठी एक खास ट्विट केले आहे.

नवी दिल्ली- विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आज आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत. विराट कोहलीने यानिमित्त अनुष्कासाठी एक खास ट्विट केले आहे. लग्नाच्या तीन वर्षानंतर या दाम्पत्याने आपल्या चाहत्यांना काही महिन्यांपूर्वीच खुशखबर देत अनुष्का ही गर्भवती असल्याचे सांगितले होते. लवकरच त्यांच्या घरात एक चिमुकला येणार असल्याने विराटने त्याची पूर्व तयारी करण्यासाठी पालकत्व रजाही घेतली आहे. पहिला कसोटी सामना खेळून तो आपला ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडून येणार आहे. दरम्यान, यावेळी कोहलीने पत्नी अनुष्कासाठी एक खास ट्विट केले आहे. लग्नाचा एक गोड फोटो शेअर करताना म्हटले आहे की, 'आयुष्यभराच्या साथीतील तीन वर्ष पूर्ण झालेत'

विराट आणि अनुष्का आपापल्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. विराट हा क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम खेळाडू असून त्याने ईएसपीन या माध्यमाला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान म्हटले होते की, 'मला माझे आयुष्य आहे. मला माझे कुटुंबही आहे. मला भविष्यात मुलेही असतील. माझा वेळ त्यांच्यासाठीही महत्वाचा आहेच. ते माझ्या अत्यंत जवळचे आहेत याबाबत कोणतेही दुमत नाही. माझ्या कारकिर्दीचा कोणताही प्रभाव कुटुंबावर होणार नाही याची मी नेहमीच काळजी घेतो. मला मिळालेल्या बक्षिसांचा, सन्मानांचा माझ्या पाल्यांवरही कोणताही प्रभाव होणार नाही याची दक्षताही मी कायम घेईन. एका माध्यमाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुष्कानेही आपल्या या बाळंतपणानंतर लवकरच कामावर परतणार असल्याचे म्हटले आहे. आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची खात्रीही तिने दिली. यावेळी ती म्हणाली, 'माझ्या पहिल्या पाल्याला जन्म दिल्यानंतर मी लवकरच चित्रीकरणात व्यस्त होणार आहे. यादरम्यान घर आणि शुट यात वेळेचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणार आहे. मला अजून खूप काम करायचे अजून जीवन आहे तोवर मी अभिनय करतच राहणार आहे.

संबंधित बातम्या