'बायो बबलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर्संना अधिक मदतीची गरज': जेसन होल्डर

21 नोव्हेंबरपासून गॅले येथे सुरु होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजच (West Indies) संघ परिस्थिती सुधारण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
'बायो बबलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर्संना अधिक मदतीची गरज': जेसन होल्डर
Jason HolderDainik Gomantak

T20 विश्वचषक वेस्ट इंडिजसाठी त्यांच्या आपेक्षेप्रमाणे चांगला गेला नाही. मात्र 21 नोव्हेंबरपासून गॅले येथे सुरु होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजच संघ परिस्थिती सुधारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) अपयशी ठरल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ आता क्रिकेटच्या दिर्घ फॉरमॅटसाठी तयारी करत आहे, असा विश्वास कसोटी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने (Jason Holder) व्यक्त केला आहे. मात्र, वेस्ट इंडिजचा हा संघ पूर्णपणे नवीन आहे. केवळ जेसन होल्डर आणि अष्टपैलू रोस्टन चेस (Roston Chase) यांचा T20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला होता, ज्यांचा श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) सध्याच्या कसोटी मालिकेतही समावेश आहे.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला विचारण्यात आले असता, सध्याचा वेस्ट इंडिज संघ T20 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीमुळे दडपणाखाली असेल का? उत्तरात तो म्हणाला, 'मला नाही वाटत. आम्हाला माहीत आहे ही, एक पूर्णपणे वेगळी टीम आहे. हा फ्रेश ग्रुप आहे. क्रिकेटप्रेमींनी आमच्याकडून काय अपेक्षा हे त्यांना चांगलेच माहित आहे. आम्ही जिंकू शकतो हे दाखवून दिले आहे. आम्ही बांगलादेशात जिंकलो. मात्र, आम्ही फक्त क्रिकेट खेळणार आहोत. आम्हाला माहित आहे की, आम्ही खेळू शकतो. मला वाटते जेव्हा आपल्याकडून खूप अपेक्षा केल्या जातात तेव्हा आपण अडचणीत येतो. प्रत्येकाची स्वतःची भूमिका असते. आता आम्हाला आमच्या क्षमतेनुसार खेळायचे असून जिंकण्याची सर्वोत्तम संधी मिळाली आहे.' असे होल्डरने माध्यमाला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले.

Jason Holder
IND vs NZ: मलिकेत चांगला विजय मिळाला असला तरी पाय जमिनीवर ठेवावे लागतील

बायो बबल कठीण खूप आव्हानात्मक

जेसन होल्डरने त्याचे दोन वाढदिवस बायो बबलमध्ये घालवले आहेत. अष्टपैलू होल्डरने सांगितले की, मला कुटुंबापासून आणि जवळच्या नातेवाईकांपासून दूर राहणे खूप आव्हानात्मक आहे. आता श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यासाठी आम्ही स्वत:ला सज्ज केले आहे.

तो पुढे म्हणाला होय, ते खूप आव्हानात्मक होते. मी जवळजवळ एक वर्ष बायो बबलमध्ये घालवले. हे खरोखर खूप कठीण आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर मी स्वत:साठी थोडा वेळ काढणार आहे. आता बराच वेळ निघून गेला आहे. बार्बाडोसमध्ये माझे मित्र आणि कुटुंबापासून दूर राहणे खूप कठीण होते. शेवटच्या वेळी मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बार्बाडोसमध्ये मालिका खेळत होतो, तेव्हा मी बायो बबलमध्ये अडकलो तेव्हा घरीही जाऊ शकलो नव्हतो. माझ्या स्वतःच्या देशात असूनही बायो बबलमध्ये अडकणे खूप कठीण होते.

तो पुढे म्हणाला, बायो बबल अडकूनही मैदानात चांगली कामगिरी करुन मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहणे खूप आव्हानात्मक असते. आशा आहे की, बायो बबल लवकर संपले अन् सर्व काही सामान्य होईल. यादरम्यान होल्डरला विचारण्यात आले की, वेस्ट इंडिज बोर्डाने खेळाडूंसाठी पूर्णवेळ मानसिक आरोग्य डॉक्टर नियुक्त केले आहेत का? यावर सकारात्मक उत्तर देताना ते नक्कीच व्हायला हवे.

Jason Holder
IND vs NZ: टीम इंडियाकडून T20 मालिकेत किवींना पुन्हा एकदा 'क्लीन स्वीप'

मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांनीही खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली असल्याचे होल्डर म्हणाले. त्याच वेळी, अनेक संघ पूर्णवेळ क्रीडा मानसशास्त्रज्ञ नियुक्त करण्याची तयारी करत आहेत. यावर होल्डर म्हणाला की, पार्कमध्ये फिरणे किंवा परिचित लोकांशी बोलणे यासारखे क्रियाकलाप थकल्यासारखे मन शांत करण्यासाठी पुरेसे असतात, परंतु व्हिडिओ कॉलवर कुटुंबाशी बोलणे असे काही नाही.

दरम्यान तो पुढे म्हणाला, तुम्हाला काही वेळ सुट्टी हवी आहे हे, तुम्हाला माहीत असताना इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला मदत करत नाही. आपले मित्र, कुटुंब आणि जवळच्या लोकांना भेटणे खूप महत्वाचे आहे. हॉटेलमध्ये अडकणे हे खूप कठीण काम आहे. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, 2022 मध्ये सर्व काही सामान्य होईल अशी आशा आहे. बहुतेक सरकारे या प्रयत्नात गुंतले आहेत.

'अति क्रिकेट चांगलं नाही'

सध्या क्रिकेट स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकावर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सारख्या देशांतर्गत टी20 लीगमध्ये अधिक पैसे कमवण्याऐवजी अनेक खेळाडूंनी नकार देणे पसंत केले.,

होल्डर म्हणाला, शेड्यूल करताना मानसिक स्थितीची काळजी घेतली जाते असे मला वाटत नाही. सध्या खूप क्रिकेट खेळले जात आहे. लॉकडाऊनमुळे आम्ही दोन-तीन महिने घरातच अडकून राहीलो, त्यामुळे संपूर्ण कॅलेंडर बिघडले, पण जास्त क्रिकेट खेळणे चांगले नाही. अशा परिस्थितीत आपल्यासारख्या अनेकांसाठी कमाईचे साधन असलेल्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली की, ती संधी नाकारणे कठीण होऊन बसते.

Jason Holder
IND vs NZ: न्यूझीलंडला नमवण्यासाठी संघांत 'यांची' एन्ट्री तर काहींना विश्रांती

त्याने पुढे सांगितले की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी 100 टक्के वचनबद्ध असून मी प्रत्येक फॉरमॅटमध्ये मालिका खेळलो. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे आयपीएल खेळण्याचा पर्याय असेल, जिथे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता, तेव्हा ते नाकारणे फार कठीण आहे. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाने निःपक्षपातीपणे मूल्यांकन केले पाहिजे.

टी-20 क्रिकेटमध्ये सलामीची योजना'

विशेष म्हणजे, 30 वर्षीय जेसन होल्डर हा आक्रमक खेळाडू आहे, तो लांब षटकार मारतो. होल्डरने सनरायझर्स हैदराबाद आणि बार्बाडोस रॉयल्ससाठी अनेक वेळा 'फिनिशर'ची भूमिका बजावली, ज्यामुळे त्याचे महत्त्व वाढले. टी-20 मध्ये त्याच्या गोलंदाजीत एक नवा आयाम पाहायला मिळाला. विंडीजच्या या प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूला आता टी-20 क्रिकेटमध्ये सलामी करायची आहे.

तो म्हणाला, माझ्या मते T20 मध्ये माझ्या गोलंदाजीत खूप सुधारणा झाली आहे. मी विविधतेवर खूप काम करत आहे, जे T20 क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे गोलंदाजी करण्यासाठी योग्य चेंडू असू शकतो, पण तुम्हाला सपोर्ट मिळत नाही. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मला फक्त काही चेंडू खेळण्याची संधी मिळते, पण आता मला सलामी करायची आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com