सर्वाधिक गोलांच्या स्पर्धेत या श्रेष्ठ खेळाडूला मागे टाकत रोनाल्डोने दुसऱ्या क्रमांकावर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 5 जानेवारी 2021

सर्वाधिक गोलांच्या स्पर्धेत पेले यांना मागे टाकून ख्रिस्तियानो रोनाल्डोने दुसरा क्रमांक मिळवला. रोनाल्डोच्या दोन गोलमुळे युव्हेंटिसने इटलीतील सिरी ए साखळीत उदीनीस संघास ४-१ असे सहज पराजित केले.

रोम :  सर्वाधिक गोलांच्या स्पर्धेत पेले यांना मागे टाकून ख्रिस्तियानो रोनाल्डोने दुसरा क्रमांक मिळवला. रोनाल्डोच्या दोन गोलमुळे युव्हेंटिसने इटलीतील सिरी ए साखळीत उदीनीस संघास ४-१ असे सहज पराजित केले. युव्हेंटिसच्या विजयापेक्षा रोनाल्डोने पेले यांना मागे टाकल्याची चर्चा सर्वाधिक झाली. रोनाल्डोचे आता एकूण ७५८ गोल झाले आहेत; तर पेले यांचे ७५७. अर्थात पेले आणि रोनाल्डो यांच्यापेक्षा जास्त गोल करण्याचा विक्रम जोसेल बिकान यांचा आहे. त्यांनी १९३१ ते १९५५ या कालावधीतील ५३० सामन्यांत ८०५ गोल केले आहेत. लिओनेल मेस्सीने काही दिवसांपूर्वी पेले यांचा एका क्‍लबकडून सर्वाधिक ६४४ गोल करण्याचा विक्रम मोडला होता. आता रोनाल्डोने पेले यांना सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत मागे टाकले.

रेयाल माद्रिदकडून ४५० गोल करण्याचा पराक्रम केलेल्या रोनाल्डोने गेल्या वर्षी ७०० गोलांचा टप्पा गाठला होता. त्या वेळी युव्हेंटिसकडे असतानाच रोनाल्डो सर्वाधिक गोलांचा विक्रम करेल, असे त्याच्या एजंटने सांगितले होते. दरम्यान, या चमकदार कामगिरीनंतरही रोनाल्डोचा युव्हेंटिस एसी मिलान संघापासून १० गुणांनी दूर आहे. एसी मिलानने अग्रस्थान भक्कम करताना बेनेवंतोला २-० असे हरवले; तर दुसऱ्या क्रमांकावरील इंटर मिलानने क्रोटोनचा ६-२ असा धुव्वा उडवला.

 

अधिक वाचा :

INDvsAUS भारतीय खेळाडू  प्राणिसंग्रहालयातील प्राणी नाही..तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न

 

संबंधित बातम्या