धावपटूंच्या अर्जासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठीचे निकष शिथिल

pib
शनिवार, 11 जुलै 2020

 46 नामांकित धावपटूंची निवड 23 क्रीडाप्रकारांसाठी (प्रत्येक प्रकारात  1 पुरुष, 1 महिला प्रशिक्षक) केली जाईल आणि त्यांना प्रवेश परीक्षेला हजर राहावे लागणार नाही कारण अभ्यासक्रमाच्या इतिहासात प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन करण्यात आली आहे. . सर्व प्रख्यात धावपटू ज्यांची या अभ्यासक्रमासाठी थेट  निवड झाली आहे त्यांना इतर उमेदवारांबरोबर वैद्यकीय आणि शारीरिक चाचणी द्यावी  लागेल.

नवी दिल्ली, 

प्रथमच 2020-21 सत्रापासून पटियाला येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था (एनएसएनआयएस) येथे क्रीडा प्रशिक्षणातील महत्वाकांक्षी पदविका अभ्यासक्रमासाठी 46 प्रख्यात धावपटूंना महिला आणि पुरुष दोन्ही, थेट प्रवेश मिळेल. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी मे महिन्यात हा निर्णय जाहीर केला होता. आता अभ्यासक्रमात प्रख्यात धावपटूंचा मोठा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने यापूर्वी नमूद केलेल्या प्रवेशाच्या निकषांपैकी काही निकष शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता सर्व नामांकित धावपटूंसाठी 10+2 राहील, मात्र  क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या निकषात  बदल करण्यात आले आहेत  जेणेकरून आशियाई आणि राष्ट्रकुल पदकविजेते आणि वरिष्ठ जागतिक अजिंक्यस्पर्धेतले  सहभागी मोठ्या संख्येने या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील.  यापूर्वी उमेदवाराला वरिष्ठ जागतिक अजिंक्यस्पर्धेमध्ये पदक मिळवणे अनिवार्य होते, मात्र नवीन निकषात ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. आशियाई किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या निकषाऐवजी यापैकी कुठल्याही स्पर्धेत कोणतेही पदक -सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक विजेता असा बदल करण्यात आला आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले प्रसिद्ध धावपटू या अभ्यासक्रमासाठी  अर्ज करण्यास आपोआप पात्र ठरतात.

या निर्णयाबद्दल बोलताना भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे  महासंचालक संदीप प्रधान म्हणाले की, “भारताच्या वाढत्या क्रीडा परिसंस्थेच्या उदयोन्मुख गरजा भागवण्याची वाढती गरज आणि देशातील सर्वोत्तम प्रतिभावान खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी  मार्गदर्शन अभ्यासक्रमात  प्रख्यात भारतीय धावपटूंचा समावेश महत्वाचा आहे. प्रख्यात धावपटूंसाठी प्रवेश निकष शिथिल केल्यामुळे त्यांच्यापैकी अनेकजण या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. "

जर दोन नामांकित धावपटू  एकाच क्रीडा प्रकारासाठी  अर्ज करत असल्यास अंतिम उमेदवार निवडण्यासाठी गुण व्यवस्था  ठेवली आहे.

प्रख्यात धावपटूंसाठी निकष शिथिल केल्याच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमासाठी नावनोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत  31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

प्रख्यात धावपटूंव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी कोरोना महामारीच्या सद्यस्थितीच्या अनुषंगाने असा निर्णय घेण्यात आला आहे की जे उमेदवार  पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत  किंवा जर त्यांनी प्रवेश घेतलेल्या विद्यापीठांनी अद्याप  पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली नसेल असे उमेदवार देखील पदविका  अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात मात्र त्यांना  30 सप्टेंबर 2020 पर्यंत अंतिम वर्ष उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

संपादन - तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या