ISL Football : एफसी गोवा, ओडिशासाठी उद्याचा महत्त्वाचा सामना

लक्ष्य विजयाच्या पूर्ण तीन गुणांचे
FC Goa Team
FC Goa TeamDainik Gomantak

ISL Football : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील काही ताज्या निकालानंतर प्ले-ऑफ फेरीच्या पात्रतेची चुरस वाढली. प्रत्येक संघ विजयाच्या पूर्ण तीन गुणांचेच लक्ष्य बाळगून आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. 6) भुवनेश्वर येथे ओडिशा एफसीविरुद्ध एफसी गोवा संघ महत्त्वाच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल.

एफसी गोवा व ओडिशा यांच्यात सध्या फक्त तीन गुणांचा फरक आहे. गोवा 26 गुणांसह पाचव्या, तर ओडिशा 23 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. सातव्या क्रमांकावरील बंगळूर एफसी जास्त दूर नाही.

त्यांचे 22 गुण आहेत. सोमवारी कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने विजय नोंदविल्यास त्यांच्यासाठी पूर्ण गुण निर्णायक ठरतील व गुणतक्त्यात प्रगती साधता येईल. जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ जिंकल्यास ते गोव्यातील संघाशी गुणांची बरोबरी साधतील.

FC Goa Team
Goa: शिक्षा रद्द! ताडीच्या मडक्याला अल्पवयीन विद्यार्थ्याचा पाय लागल्याने केली होती मारहाण

‘‘प्ले-ऑफची शर्यत अटीतटीची ठरत आहे. आमच्यासाठी पुढील सामना खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला जिंकावेच लागेल आणि पूर्ण तीन मिळवावे लागतील. आमच्यासाठी हा सामना खडतर असेल. प्रतिस्पर्ध्यांचीही अशीच स्थिती आहे."

"हल्ली त्यांना सकारात्मक निकाल साकारलेले नाही. ताजा विजय निश्चित आम्हाला आत्मविश्वास उंचावण्यास साह्यभूत ठरेल,’’ असे कार्लोस पेनया यांनी सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले.

ओडिशा घरच्या मैदानावर मजबूत

एफसी गोवा संघ घरच्या मैदानावर शानदार खेळतो, त्याचप्रमाणे ओडिशा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर भक्कम आहे ही बाब पेनया यांनी मान्य केली.

तरीही इतरांबाबत विचार करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करणे हाच योग्य उपाय आहे, असे एफसी गोवाच्या प्रशिक्षकाने नमूद केले. ओडिशा संघ घरच्या मैदानावर बलवान असल्याने सोमवारचा सामना निश्चितच आव्हानात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

FC Goa Team
Shikhar Dhawan Wife: 'या' गोष्टी करू नकोस..., शिखरच्या पत्नीला कोर्टानं खडसावलं

मागील तीन सामन्यांत

स्पर्धेतील मागील तीन सामन्यात एफसी गोवा संघ अपराजित आहे. त्यांनी दोन विजय व एका बरोबरीसह सात गुणांची कमाई केली आहे. यापूर्वीच्या लढतीत त्यांनी फातोर्ड्यात केरळा ब्लास्टर्स व ईस्ट बंगालला नमविले.

ओडिशा एफसी कामगिरी उठावदार नाही. तीनपैकी दोन सामने त्यांनी गमावले असून बरोबरीचा फक्त एक गुण त्यांना मिळाला. त्याबाबत पेनया यांनी सावध पवित्रा व्यक्त केला. ओडिशा संघ सध्या संघर्ष करताना दिसत असला, तरी त्यांना कमी लेखता येणार नसल्याचे त्यांना वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com