Premier League 2022-23: क्रिस्टल पॅलेस विरुद्ध आर्सेनल लढतीने होणार हंगामांची सुरुवात

प्रीमियर लीग (Premier League) हंगामाची सुरुवात शुक्रवारी, 5 ऑगस्ट रोजी क्रिस्टल पॅलेस विरुध्द आर्सेनलच्या लढतीने होणार आहे.
Premier League 2022-23: क्रिस्टल पॅलेस विरुद्ध आर्सेनल लढतीने होणार हंगामांची सुरुवात
Premier League 2022-23Dainik Gomantak

Premier League 2022/23 fixtures: प्रीमियर लीग हंगामाची सुरुवात शुक्रवारी, 5 ऑगस्ट रोजी क्रिस्टल पॅलेस विरुध्द आर्सेनलच्या लढतीने होणार आहे. मँचेस्टर युनायटेड 2022-23 प्रीमियर लीग हंगामाची सुरुवात ब्राइटनविरुद्धच्या सामन्याने होणार आहे, तर मँचेस्टर सिटी आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी झुंजणार आहे. (Crystal Palace vs Arsenal to begin new season on 5 August)

दरम्यान, गेल्या हंगामात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला लिव्हरपूल नव्याने प्रमोशन केलेल्या फुलहॅमला जाणार आहे. तर नॉटिंगहॅम फॉरेस्ट 23 वर्षांनंतर प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन करण्यासाठी न्यूकॅसल युनायटेड येथे खेळणार आहे.

Premier League 2022-23
GCA Premier League: 'लयभारी जीनो’; चौगुले क्लबवर सनसनाटी विजय

दुसरीकडे, चेल्सी टॉड बोहली आणि क्लियरलेक कॅपिटल यांच्या नेतृत्वाखालील नव्या मालकीखाली एव्हर्टनशी खेळून आपल्या हंगामाची सुरुवात करणार आहे. मँचेस्टर युनायटेडचे नवे व्यवस्थापक एरिक टेन हॅग यांच्या नेतृत्वाखाली, ब्राइटन आणि होव्ह अल्बियन विरुद्ध घरच्या मैदानावर आपल्या मोहिमेची सुरुवात करेल आणि टॉटेनहॅम हॉटस्पर साउथम्प्टनचे यजमानपद भूषवेल. हंगाम 5 ऑगस्ट रोजी सुरु होईल आणि 28 मे रोजी संपेल.

Premier League 2022-23
Football Premier League वर कोरोनाचे सावट

शेवटी, कतारमध्ये 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या विश्वचषकासाठी 12 नोव्हेंबरनंतर मध्य-हंगामी विश्रांती असेल. बॉक्सिंग डेला लीग पुन्हा सुरु होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com