IPL 2021 CSK vs RR: वानखेडेवर कोण ठरणार किंग?  

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

आयपीएलमधील आजचा 12 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आहे

आयपीएलमधील आजचा 12 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ दोन सामने खेळले आहेत. चेन्नईने खेळल्या गेलेल्या त्यांच्या दोन सामन्यांत त्यांनी एक जिंकला असून एकामध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे राजस्थाननेही पंजाबविरुद्धचा पहिला सामना गमावला. परंतु, राजस्थानने दुसर्‍या सामन्यात दिल्लीचा पराभव केला. आजचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडेवर कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. ( CSK vs RR: Who will be the King of Wankhede?)

Goa Professional League: एफसी गोवाला रोखत सेझाने साधली बरोबरी

बेन स्टोक आयपीएलमधून बाहेर
आयपीएलच्या मध्यात राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. टीमचा अष्टपैलू बेन स्टोक्स दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत संघाची समस्या वाढली आहे. तथापि, शेवटच्या सामन्यात ख्रिस मॉरिसने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला होता. शेवटच्या सामन्यात राजस्थानची फलंदाजी  खराब झाली होती. वरच्या फळीतील फलंदाज फार एकही चांगली कामगिरी करू साचले नाहीत. शेवटच्या सामन्यात डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस यांनी सामना वाचवला होता. या दोन फलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली नसती तर राजस्थानला त्यांच्या बाजूने सामना जिंकणे  अवघड झाले असते.

जयदेव उदानकट फॉर्ममध्ये 
शेवटच्या सामन्यात राजस्थानसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे राजस्थानचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट पुन्हा फॉर्मात आला आहे. मागील हंगामात या खेळाडूची कामगिरी तितकी चांगली नव्हती. उनादकटला पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्याने दिल्लीविरुद्ध शानदार गोलंदाजी करत दिल्लीला कमी धावसंख्येत रोखण्यात यशस्वी ठरला होता.

चेन्नईचे पारडे जड
आतापर्यंत दोन्ही संघामध्ये  झालेल्या सामन्यांत चेन्नईचे रेकॉर्ड चांगले आहे . दोन्ही संघ आतापर्यंत 23 वेळा समोरासमोर आले आहेत, त्यापैकी चेन्नईने 14 वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर राजस्थानने केवळ 9 सामने जिंकले आहेत. मात्र, आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जवर वर्चस्व राखले.

धीरज एफसी गोवासाठी `सुपरमॅन`सारखा प्रशिक्षक हुआन फेरांडोने केलं कौतुक

चेन्नई सुपर किंग्स संभाव्य संघ 
ऋतूराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कप्तान/विकेटकिपर), ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, मोईन अली, सॅम करण, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

राजस्थान रॉयल्स संभाव्य संघ
मनन वोहरा, जोस बटलर, संजू सॅमसन (कप्तान/विकेटकिपर), रियान पराग, डेव्हिड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारीया
 

संबंधित बातम्या