CWG 2022: एल्डोस पॉलने सुवर्ण तर अबूबकरने जिंकले रौप्यपदक

पुरुषांच्या तिहेरी उडीच्या अंतिम फेरीत भारताच्या एल्डोस पॉलने सुवर्ण आणि भारताच्या अब्दुल्ला अबूबकरने रौप्यपदक जिंकले आहे.
CWG 2022
CWG 2022Dainik Gomantak

Commonwealth Games 2022 | बर्मिंगहॅम येथे रविवारी झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पुरुषांच्या तिहेरी उडीच्या अंतिम फेरीत एल्डोस पॉलने (Aldous Paul) ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले तर हे आता भारतासाठी दिवसातील तिसरे सुवर्णपदक आणि CWG मधील सहावे अॅथलेटिक्स सुवर्णपदक आहे. पॉलचा सहकारी अब्दुल्ला अबूबकरने (Abdullah Abubakar) पाचव्या प्रयत्नात 17.02 मीटर उडी मारून रौप्यपदक जिंकले. (CWG 2022 Aldous Paul wins gold Abdullah Abubakar silver)

एल्डोस पॉलने 17.03 मीटर अंतर पार करून सुवर्णपदक जिंकले तर त्याचवेळी अब्दुल्ला अबुबकरने 17.02 मीटर अंतरासह रौप्यपदकावर आपल्या नावावर केले. भारताचा प्रवीण चित्राळे चौथ्या स्थानावर होता आणि तो कांस्यपदक जिंकण्यापासून फक्त 0.03 मीटर दूर होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com