CWG 2022: बॉक्सर निखत जरीनने बर्मिंगहॅममध्ये जिंकले सुवर्णपदक, भारताच्या खात्यात 17वे सुवर्ण

निकत जरीनने कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या 10 व्या दिवशी भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.
Nikhat Zareen
Nikhat ZareenDainik Gomantak

निकत जरीनने (Nikhat Zareen) कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या 10 व्या दिवशी भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. तिने महिलांच्या लाइट फ्लाय प्रकाराच्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कार्ले मॅकनॉलचा 5-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील टीम इंडियाचे हे 48 वे पदक आहे. तर बॉक्सिंगमधील हे तिसरे सुवर्णपदक आहे. विशेष म्हणजे निकतने पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक मिळवले आहे. (CWG 2022 India boxer Nikhat Zareen wins Gold in 48 50 Kg flyweight category)

भारत आतापर्यंत 17 सुवर्ण पदकांसह 48 पदके जिंकून पदकतालिकेत चौथ्या स्थानावरती आहे. निकतने या वर्षी मे महिन्यात तुर्कीमध्ये महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारी जरीन पाचवी भारतीय महिला ठरली आहे.

छोटे कपडे घालून बॉक्सींगचा सराव करते म्हणून टोमणे देणाऱ्या लोकांची आठवण करून देत वडील जमील म्हणाले होते की, खेळ खेळण्यासाठी शॉर्ट्स परिधान केलेल्या मुस्लिम मुलीवर आक्षेप घेतात. दरम्यान, ते म्हणाले की कुटुंब त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकले. “पण जेव्हा युथ चॅम्पियनशिप जिंकली तेव्हा लोकांनी त्यांचे मत बदलले आणि तिने स्वतःला सिद्ध केले''.

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी तिने इंग्लंडच्या स्टबली अल्फिया सवानाचा 5-0 असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. "मेरा काम है बस रिंग में जाके मुक्के फेकना और देश का नाम रोशन करना'' मला शांत होऊन पुन्हा सुरुवात करायची आहे," निखतने माध्यमांना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com