CWG 2022: अभिमानास्पद! भारताच्या संदीप कुमारने 10,000 मीटर रेस वॉकमध्ये जिंकले कांस्यपदक

भारताच्या संदीप कुमारने 10,000 मीटर रेस वॉकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
Sandeep Kumar
Sandeep KumarDainik Gomantak

Commonwealth Games 2022 | भारताच्या संदीप कुमारने (Sandeep Kumar) 10,000 मीटर रेस वॉकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय धावपटू संदीप कुमारने कॉमनवेल्थ स्पर्धा-2022 मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले. संदीपने 38 मिनिटे 49:21 सेकंदात शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा इव्हान डनफी पहिल्या क्रमांकावर होता, ज्याने 38 मिनिटे 36:37 सेकंदात सुवर्णपदक जिंकले आहे.

दुसरीकडे, हे अंतर 38 मिनिटे 42:33 सेकंदात पार करणाऱ्या डेक्लन टिंगेने रौप्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेतील आणखी एक भारतीय, अमित खत्री, 43:04.97 च्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह नवव्या स्थानावर राहिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com