CWG 2022: भारतीय पुरुष हॉकी संघाकडून पदकाची आशा, जाणून घ्या सामना कधी अन् कुठे पहायचा

भारतीय संघ आजचा सामना जिंकून हॉकीमध्ये रौप्य पदक आपल्या खात्यात जमा करण्याची आशा आहे.
IND vs South Africa Hockey Match
IND vs South Africa Hockey MatchTwitter

IND vs South Africa Hockey Match: बर्मिंगहॅम येथे चालू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये, आज (6 ऑगस्ट) भारतीय पुरुष हॉकी संघ त्यांचा उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. येथे भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पगडा भारी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशा स्थितीत भारतीय संघ आजचा सामना जिंकून हॉकीमध्ये रौप्य पदक निश्चित करेल अशी आशा आहे.

IND vs South Africa Hockey Match
CWG 2022: भारत रचणार इतिहास, यजमान इंग्लंडची होणार बत्ती गुल?

भारतीय संघाने त्यांच्या पूल-बी मधील चारपैकी तीन सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारताने वेल्स, कॅनडा आणि घाना यांचा एकतर्फी पराभव केला. दुसरीकडे भारताचा इंग्लंडविरुद्ध सामना करावा ड्रॉ करावा लागला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्यांच्या पूल-अ मध्ये चारपैकी दोन सामने जिंकले. एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि एक सामना अनिर्णित राहिला.

यावर्षी झालेल्या FIH प्रो लीगमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 10-2 असा पराभव केला. एकूणच सामन्यांमध्येही भारताचे संघ दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड दिसते. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 34 पैकी 22 सामने भारताने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने केवळ 7 सामने जिंकले आहेत. मात्र, हे सर्व असूनही भारतीय संघाला या 13व्या मानांकित संघाविरुद्ध कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा दाखवायचा नाही.

IND vs South Africa Hockey Match
CWG 2022: भारतावर झालेल्या अन्यायाला जबाबदार कोण? अंतिम फेरी गाठण्याचे भंगले स्वप्न

स्पर्धा कधी आणि कुठे बघायची?

भारत आणि दक्षिण आफ्रिका पुरुष हॉकी संघाचा हा महत्त्वाचा सामना आज (6 ऑगस्ट) रात्री 10.30 वाजता सुरू होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हा सामना पाहू शकता. सोनी LIV अॅपवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवरही केले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com