CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान सुरक्षेत मोठी चूक, कुस्तीच्या सामन्यांना स्थगिती

बर्मिंगहॅममधील कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान सुरक्षा त्रुटींमुळे कुस्तीचे सामने स्थगित करण्यात आले आहेत.
CWG 2022
CWG 2022Dainik Gomantak

बर्मिंगहॅममधील (Birmingham) कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान सुरक्षा त्रुटींमुळे कुस्तीचे सामने स्थगित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण स्टेडियमही रिकामे करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार आता कुस्तीचे अंतिम सामनेही लांबणार आहेत. भारताच्या बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी पहिली फेरी जिंकली आहे. दोघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. (CWG 2022 Major security lapse during Commonwealth tournament wrestling matches suspended)

CWG 2022
Brittany Griner: अमेरिकन बास्केटबॉल महिला खेळाडूला रशियात 9 वर्षांचा तुरुंगवास

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ट्विट केले की, "आम्ही सुरक्षा तपासणीसाठी कुस्तीचा खेळ थांबवत आहोत. परवानगी मिळाल्यावर खेळ पुन्हा सुरू करण्यात येईल." तसेच मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:15 वाजता कुस्तीचे सामने पुन्हा सुरू होणार आहेत.

दीपक पुनिया आणि बजरंग पुनिया यांनी कुस्तीत विजय मिळवला

भारतीय खेळाडूंनी कुस्तीमध्ये चमत्कार घडवला आहे. बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया या दोघांनीही पहिले सामने जिंकले आहेत. बजरंगने नौरूच्या लॉ बिंगहॅमचा 4-0 असा पराभव केला, तर दीपक पुनियाने न्यूझीलंडच्या मॅथ्यूचा 10-0 असा पराभव केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com