CWGमध्ये मोठा गोंधळ, लाईव्ह मॅचमध्ये खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी, Video Viral

दोघांनी एकमेकांचे टी-शर्ट पकडले आणि ओढायला सुरुवात केली. क्रीडांगण हे रणांगण बनल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
Canada vs England Hockey Match
Canada vs England Hockey MatchDainik Gomantak

Canada vs England Hockey Match: गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेत इंग्लंड आणि कॅनडा यांच्यात पुरुष हॉकी सामना खेळला गेला. हा सामना हॉकीचा होता, मात्र प्रेक्षकांना त्यात कुस्ती पाहायला मिळाली. जेव्हा इंग्लंड आणि कॅनडाचे खेळाडू एकमेकांशी भिडले आणि जोरदार मारामारी झाली. हा पराक्रम पाहून प्रेक्षक थक्क झाले. खेळाडूंमधील हाणामारी इतकी वाढली की नंतर रेफ्रींना येऊन हस्तक्षेप करावा लागला. (Commonwealth Games 2022)

Canada vs England Hockey Match
CWG 2022: पुरुष हॉकीमध्ये भारताची कॅनडावर 8-0ने मात

कॅनडा आणि इंग्लंडचे खेळाडू भिडले

उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागला. यासाठी इंग्लंड संघाचे खेळाडू कॅनडाविरुद्ध गोल करण्यासाठी सतत आक्रमक खेळ दाखवत होते. त्यानंतर बलराज पानेसरची हॉकी स्टिक इंग्लंडच्या ख्रिस ग्रिफिथच्या हाताला लागली आणि ती अडकली. यामुळे संतापलेल्या ग्रिफिथने पानेसरला धक्काबुक्की केली, त्यामुळे संतप्त झालेल्या पनेसरने इंग्लंडच्या खेळाडूची मान पकडली. मग दोघांनी एकमेकांचे टी-शर्ट पकडले आणि ओढायला सुरुवात केली. क्रीडांगण हे रणांगण बनल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

पंचांनी हस्तक्षेप केला

बलराज पानेसर आणि ग्रिफिथ यांच्यात एवढी भयानक लढत झाली, की ते पाहून प्रेक्षकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना झाला. नंतर पंचांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आले आणि दोघांना वेगळे केले. यानंतर रेफ्रींनी कॅनडाच्या बलराज पानेसरला रेड कार्ड दाखवून सामन्यातून बाहेर पाठवले. त्याचवेळी इंग्लंडच्या ख्रिस ग्रिफिथला यलो कार्ड दाखवून इशारा देण्यात आला.

Canada vs England Hockey Match
Sudhir Win Gold Medal: सुधीरने पॅरापॉवरलिफ्टिंगमध्ये गोल्ड जिंकून रचला इतिहास

इंग्लंडने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला

कॅनडाला एका खेळाडूचे नुकसान सहन करावे लागले. याची किंमत त्याला सामना गमावून चुकवावी लागली. इंग्लंडने हा सामना 11-2 ने जिंकला, पण तरीही संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना 15 गोलच्या फरकाने विजय मिळवावा लागला. त्याचबरोबर भारतीय संघाने शानसह उपांत्य फेरी गाठली आहे. आजपर्यंत राष्ट्रकुलच्या इतिहासात टीम इंडियाला सुवर्णपदक मिळालेले नाही, पण यावेळी मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारत इतिहास रचू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com