CWG 22: सांगलीच्या संकेतने 'दिल जीत लिया', राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवले रौप्य

Sanket Mahadev Sargar: भारताच्या संकेत महादेव सारगरने 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोसह भारतासाठी रौप्य पदक जिंकले.
Sanket Mahadev Sargar
Sanket Mahadev SargarDainik Gomantak

CWG 22: सांगलीच्या संकेत महादेव सारगरने 55 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. CWG 22 मध्ये भारतासाठी हे पहिले पदक आहे. संकेत हा भारताचा उदयोन्मुख वेटलिफ्टर आहे. त्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक मानसन्मान पटकावले आहेत. तो 55 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतो.

दरम्यान, संकेतने डिसेंबर 2021 मध्ये ताश्कंदमधील (Tashkent) कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2021 मध्ये पुरुषांच्या 55 किलो स्नॅच प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. संकेतने सुवर्णपदकासाठी 113 किलो वजन उचलले होते. या लिफ्टसह संकेतने स्नॅचचा नवा राष्ट्रीय विक्रमही केला आहे.

Sanket Mahadev Sargar
CWG 2022: या खेळाडूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकले पहिले सुवर्ण, पाहा VIDEO

दुसरीकडे, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात संकेतची भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. सांगलीला (Sangli) वेटलिफ्टिंगची जुनी परंपरा आहे. संकेत (21) हा शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तो खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 चा चॅम्पियन राहीला आहे. त्याचबरोबर 55 किलो वजनी गटात त्याने राष्ट्रीय विक्रम (स्नॅच 108 किलो, क्लीन अँड जर्क 139 किलो आणि एकूण 244 किलो) देखील केला आहे.

तसेच, संकेतने पटियाला (Patiala) येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नव्या विक्रमाची नोंद केली होती. 2021 टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) रौप्यपदक विजेती मीराबाई चानूच्या (Mirabai Chanu) अनुपस्थितीतही भारतीय संघाने सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 च्या पहिल्या दिवशी विरोधी संघावर निर्णायक विजय मिळवला. संकेत 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला.

Sanket Mahadev Sargar
CWG 2022: आर्थिक अडचणींमुळे हॉकीपटू संगीताचे कुटुंब राहते कच्चा घरात

शिवाय, ताश्कंद येथे झालेल्या 2021 कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये संकेतने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. पोडियमवर अव्वल राहण्याबरोबरच संकेतने 113 किलो वजन उचलून नवा स्नॅच राष्ट्रीय विक्रमही रचला. संकेत हा वेटलिफ्टिंगमधील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या वर्ग क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलून त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सर्वांच्या नजरा त्याच्यावर होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com