Dan Christian ने अचानक निवृत्ती केली जाहीर, IPL मध्ये RCB साठी ठरला लकी!

Dan Christian Retirement: जगभरात T20 क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवणारा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅन क्रिश्चियनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Dan Christian Retirement
Dan Christian RetirementDainik Gomantak

Dan Christian Retirement: जगभरात T20 क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवणारा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅन क्रिश्चियनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. T20 क्रिकेटमधील यशस्वी खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. तो एक असा खेळाडू आहे, जो बॉल आणि बॅटने गोलंदाजांना धडकी भरवण्यात माहिर आहे. सध्या तो बीबीएलमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळत आहे.

डॅन क्रिश्चियनने ही माहिती दिली

39 वर्षीय डॅन क्रिश्चियन ऑस्ट्रेलियाकडून (Australia) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, 'काल प्रशिक्षणादरम्यान मी माझ्या सिडनी सिक्सर्सच्या सहकाऱ्यांना सांगितले की, मी बीबीएल हंगामाच्या शेवटी खेळून निवृत्त होणार आहे. आज रात्री सिडनी सिक्सर्सचा सामना होणार आहे. आणि शेवटचा सामना होबार्ट हरिकेन्सशी होईल. त्यानंतर फायनल आहे. आशा आहे की, आम्ही या हंगामात पुन्हा पुढे जाऊ शकू. मी काही गोष्टी साध्य केल्या आहेत आणि काही आठवणी आहेत.'

Dan Christian Retirement
Women's IPL: महिला आयपीएलही मालामाल! 5 वर्षांच्या मीडिया राईट्ससाठी BCCI ला मिळणार तब्बल 'इतके' कोटी

अनेक किताब जिंकले

गेल्या दशकात डॅन क्रिश्चियन जगभरातील T20 लीगमध्ये क्रिकेट खेळला. त्याने आपल्या कारकिर्दीत बहुतेक टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. 2010 पासून त्याने 9 देशांतर्गत टी-20 जेतेपदे जिंकली आहेत. बीबीएलमध्ये मेलबर्न रेनेगेड्सला ट्रॉफी मिळवून देण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आपल्या कारकिर्दीत 405 टी-20 सामने खेळले, 5809 धावा केल्या आणि 280 विकेट घेतल्या.

Dan Christian Retirement
IPL Auction: तब्बल 2 वर्षांनंतर 'या' बंगाली टायगरची IPL एन्ट्री, KKR चा मोठा निर्णय

डॅन क्रिश्चियनने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन केले. तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियाच्या राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते. 2018 मध्ये त्याने प्रथम श्रेणी सामना खेळला. ऑस्ट्रेलियाकडून त्याने 20 एकदिवसीय आणि 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्ये (IPL) आरसीबी संघातर्फे क्रिकेट खेळला आहे. त्याने आयपीएलच्या 49 सामन्यांमध्ये 460 धावा केल्या असून 38 विकेट घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com