David Warner IPL 2022 Auction: डेव्हिड वॉर्नर बनला 'दिल्लीवाला'

2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादला आयपीएल (IPL 2022) जिंकून देणाऱ्या वॉर्नरला या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) विकत घेतले.
David Warner
David Warner Dainik Gomantak

आयपीएल-2022 च्या मेगा लिलावासाठी प्रसिद्ध झालेल्या मार्की खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचे नाव देखील होते. 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादला आयपीएल (IPL 2022) जिंकून देणाऱ्या वॉर्नरला या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) विकत घेतले. या डावखुऱ्या फलंदाजासाठी या संघाने 6.25 कोटी रुपये मोजले आहेत. वॉर्नरला सनरायझर्सने (Sunrisers Hyderabad) कायम ठेवले नाही. त्यामुळे वॉर्नर लिलावात आला. विशेष म्हणजे या लिलावादरम्यान त्याच्यासाठी तीन संघ लढले, मात्र यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. (David Warner Has Been Bought By Delhi Capitals In The Mega Auction Of IPL 2022)

दरम्यान, वॉर्नरने त्याचे बेस फ्राइज 2 कोटी रुपये ठेवले होते. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी बोली लावली. वॉर्नरच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 150 सामने खेळले असून 41.59 च्या सरासरीने 5449 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने चार शतके आणि 50 अर्धशतके झळकावली आहेत.

2014 ते 2021 पर्यंतचा प्रवास

वॉर्नरची गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये केली जाते. या लीगमध्येही त्याने स्वत:ला एक उत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध केले आहे. तो 2014 पासून सनरायझर्सकडून खेळत होता. 2015 मध्ये त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने 2016 मध्ये सनरायझर्सला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेला. विशेष म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (Royal Challengers Bangalore) पराभव करुन अंतिम फेरी जिंकली. 2018 मध्येही त्याने संघाला अंतिम फेरीत नेले परंतु विजय मिळवता आला नाही. मात्र, गेल्या मोसमात सनरायझर्सने त्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. आणि नंतर त्याला अंतिम-11 मधूनही वगळण्यात आले. नंतर सनरायझर्सने त्याला आपल्यासोबतही ठेवले नाही. त्याच्या जागी सनरायझर्सने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनकडे कर्णधारपद सोपवले. फ्रँचायझीनेही त्याला कायम ठेवले असून या मोसमात किवीज सनरायझर्सचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.

दिल्लीपासून सुरुवात

वॉर्नरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीला दिल्ली डेअरडेव्हिल्स (Delhi Capitals) पासून सुरुवात केली. 2009 ते 2013 या कालावधीत तो या संघाकडून खेळला. 2009 मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. परंतु 2010 मध्ये तो पहिला आयपीएल सामना खेळण्यात यशस्वी झाला. 2010 मध्ये 11 सामने खेळत शतकासह 282 धावा केल्या. 2011 मध्ये त्याने दिल्लीसाठी 13 सामने खेळले आणि 2012 मध्ये दिल्लीने त्याला आठ सामन्यांमध्ये संधी दिली. 2013 मध्ये त्याने 16 सामने खेळले. त्यानंतर सनरायझर्स आला. गेल्या मोसमात त्याने फक्त आठ सामने खेळले असून त्याला फक्त 195 धावा करता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com