डॅझलिंग दिवास संघ बेसबॉलमध्ये विजेता

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

सोसायटी फॉर स्पोर्टस, कल्चर, यूथ अफेअर्स अँड चॅरिटी (इनसाईट) यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या महिलांच्या पहिल्या अखिल गोवा बेसबॉल स्पर्धेत जुने गोवे येथील डॅझलिंग दिवास संघाने विजेतेपद मिळविले.

पणजी : सोसायटी फॉर स्पोर्टस, कल्चर, यूथ अफेअर्स अँड चॅरिटी (इनसाईट) यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या महिलांच्या पहिल्या अखिल गोवा बेसबॉल स्पर्धेत जुने गोवे येथील डॅझलिंग दिवास संघाने विजेतेपद मिळविले. चुरशीच्या अंतिम लढतीत त्यांनी मडकईच्या नवदुर्गा वॉरियर्स संघावर 3-2 अशी एका होमने निसटती मात केली.

स्पर्धा मडकई पंचायत मैदानावर झाली. तीन डावांच्या अंतिम लढतीत डॅझलिंग दिवास संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. डॅझलिंग संघासाठी आश्लेषा नाईक, अंकिता गावडे व वैष्णवी नाईक यांनी प्रत्येकी एक होम नोंदविला. नवदुर्गा वॉरियर्स संघातर्फे विद्या सतरकर-गावडे व निकिता गावडे यांनी प्रत्येकी एक होम नोंदविला.

बक्षीस वितरण अनंत नाईक, हनुमंत नाईक, समीर नाईक, रोहन फडते यांच्या उपस्थितीत झाले. व्हेनफ्रेडा रॉड्रिग्ज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रणव प्रभुदेसाई यांनी आभार मानले.

राही नावेलकर (अंतिम सामन्याची मानकरी, डॅझलिंग दिवास), युजेनिया वाझ (उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, डॅझलिंग दिवास), गीता परवार-नाईक (उत्कृष्ट झेल, नवदुर्गा वॉरियर्स), वैष्णवी प्रभू (स्पर्धेची मानकरी, डॅझलिंग दिवास), वैष्णवी प्रभू (उत्कृष्ट बॅटर, डॅझलिंग दिवास), निकिता गावडे (उत्कृष्ट पिचर, नवदुर्गा वॉरियर्स) यांना वैयक्तिक, तर बादे युनायटेडला शिस्तबद्ध संघाचे बक्षीस मिळाले.

संबंधित बातम्या