Devon Conway - Ruturaj Gaikwad
Devon Conway - Ruturaj GaikwadDainik Gomantak

Devon Conway - Ruturaj Gaikwad: कॉनवे-ऋतुराज जोडीचा जलवा! 141 धावांची पार्टनरशीप करत विराट-डू प्लेसिसला टाकलं मागे

शनिवारी चेन्नई सुपर किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी 141 धावांची सलामी भागीदारी केली.

Devon Conway - Ruturaj Gaikwad Partnership Record: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिली. याबरोबरच त्यांनी मोठा विक्रमही केला आहे.

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी सलामीला फलंदाजी केली. त्यांनी चेन्नईला शानदार सुरूवात करून देताना शतकी भागीदारीही केली. या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली.

या दोघांनी 141 धावांची भागीदारी केली. ऋतुराजने 50 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 79 धावांची खेळी केली. तसेच कॉनवेने 52 चेंडूत 87 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यामुळे त्यांनी अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

Devon Conway - Ruturaj Gaikwad
Devon Conway: CSK च्या ओपनरचं शतक हुकलं, पण 'या' रेकॉर्ड लिस्टमध्ये बाबर आझमला पछाडलं

सलामीला 1000 धावा

कॉनवे आणि ऋतुराज यांनी सलामीला भागीदारीमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत. त्यांनी 20 डावात एकत्र सलामीला फलंदाजी करताना या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये सलामीला सर्वात जलद 1000 धावा करणारी त्यांची तिसऱ्या क्रमांकाची सलामी जोडी ठरली आहे.

त्यांनी विराट कोहली - फाफ डू प्लेसिस आणि डेव्हिड वॉर्नर - शिखर धवन यांच्या जोड्यांना मागे टाकले आहे. विराट - डू प्लेसिस आणि वॉर्नर - धवन यांनी प्रत्येकी 21 डावात सलामीला 1000 धावांची भागीदारी पूर्ण केली होती.

आयपीएलमध्ये सलामीला सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या सलामी जोड्यांमध्ये अव्वल क्रमांकावर जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर आहेत. त्यांनी सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 16 डावात 1000 धावा केल्या होत्या.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर मयंक अगरवाल आणि केएल राहुल यांची जोडी आहे. अगरवाल आणि राहुल यांनी पंजाब किंग्सकडून खेळताना 19 डावात सलामीला 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

Devon Conway - Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad, IPL 2023: ऋतुराज गायकवाडचा ‘कार तोड’ शॉट, Video पाहून तुम्ही म्हणाल...

चौथ्यांदा शतकी भागीदारी

त्याचबरोबर कॉनवे आणि ऋतुराज यांनी आयपीएलमध्ये सलामीला शतकी भागीदारी करण्याची ही चौथी वेळ होती. त्यामुळे आयपीएलमध्ये सलामीला सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये कॉनवे आणि ऋतुराज तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

  • आयपीएलमध्ये सलामीला सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या

  • 6 वेळा - डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन (सनरायझर्स हैदराबाद)

  • 5 वेळा - डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो (सनरायझर्स हैदराबाद)

  • 4 वेळा - मयंक अगरवाल आणि केएल राहुल (पंजाब किंग्स)

  • 4 वेळा - ख्रिस गेल आणि विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

  • 4 वेळा - विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

  • 4 वेळा - ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे (चेन्नई सुपर किंग्स)

चेन्नईने उभारला धावांचा डोंगर

कॉनवे आणि ऋतुराज यांच्यानंतर चेन्नईकडून शिवम दुबेने 9 चेंडूत 22 धावांची आणि रविंद्र जडेजाने 7 चेंडूत नाबाद 20 धावांची नाबाद खेळी केली. तसेच एमएस धोनी 5 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे चेन्नईने 20 षटकात 3 बाद 223 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com