VIDEO दीपक चाहरची 'स्पेशल मूमेंट', त्याने विचारले आणि ती हो बोलली

चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) त्याची मैत्रीण जया भारद्वाजला स्टँडमध्येच प्रपोज केले
VIDEO दीपक चाहरची 'स्पेशल मूमेंट', त्याने विचारले आणि ती हो बोलली
Deepak Chahar propose his girlfriend Jaya Bhardwaj on ground during PBKSvsCSK match Dainik Gomantak

IPL 2021 मध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात PBKS ने CSK चा पराभव केला आहे. मात्र हा सामना संपल्यानंतर मैदानावर एक विशेष दृश्य पाहायला मिळाले आहे . चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) त्याची मैत्रीण जया भारद्वाजला (Jaya Bhardwaj) स्टँडमध्येच प्रपोज केले, सोशल मीडियावर हा अद्भुत क्षण पाहून सर्वांनाच अशचर्याचा धक्का बसला आहे .तिथे उपस्थित असलेले सारेजण त्याचबरोबर दीपक चहरचे चाहते या क्षणाचा आनंद घेताना दिसले. (Deepak Chahar propose his girlfriend Jaya Bhardwaj on ground during PBKSvsCSK match)

जेव्हा दीपकने हे केले, तेव्हा त्याची मैत्रीण आणि आजूबाजूचे लोक हैराण झाले, विशेष गोष्ट म्हणजे हे दृश्य टीव्हीवर लाईव्ह दाखवले जात होते.

जेव्हा कालचा सामना संपला, त्यांनतर थोड्याच वेळात दीपक चाहर स्टँडवर पोहोचला आणि त्याच्या मैत्रिणीला प्रपोज केले. दीपक चाहरने एका गुडघ्यावर बसून आपल्या मैत्रिणीला प्रपोज केले, या दरम्यान आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनीही टाळ्या वाजवल्या. आणि जयाने दीपकला जेव्हा हो मध्ये उत्तर दिले तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी देखील मारली.आणि हा त्यांचा हा आंनदी क्षण आयुष्यभरासाठी साठवण झाली.

दीपक चाहरनेही इन्स्टाग्रामवर त्याचा हा खास क्षण शेअर केला आहे. दोन फोटो टाकत दीपकने कॅप्शन दिले की 'चित्र स्वतःच सर्व काही सांगत आहे', तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. जया भारद्वाज आणि दीपक चहर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दीपक चहर चे चेन्नई सुपर किंग्ज, आयपीएल, अनेक सहकारी खेळाडू आणि इतर सेलिब्रिटींनी अभिनंदन केले आहे.

Deepak Chahar propose his girlfriend Jaya Bhardwaj on ground during PBKSvsCSK match
ब्राझीलच्या फुटबॉलपटूवर झाला खुनाचा आरोप

दीपक चाहर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, गुरुवारी खेळलेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याचे नाणे काम करू शकले नाही. दीपक चहरने 4 षटकांत 48 धावा दिल्या आणि त्याला फक्त एक विकेट मिळू शकली.मात्र त्याने मैदानाबाहेर जग जिंकले.

आता प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की दीपक चाहरची मैत्रीण कोण आहे? दीपकच्या मैत्रिणीचे नाव जया भारद्वाज आहे. जया भारद्वाज बॉलिवूड अभिनेता आणि व्हीजे सिद्धार्थ भारद्वाज यांची बहीण आहे. सिद्धार्थ भारद्वाज बिग बॉसच्या 5 व्या सीझनमध्ये दिसला होता, तसेच स्प्लिट्सविला या रिअॅलिटी शोचा भाग आहे.

Related Stories

No stories found.