Qatar vs Ecuador: यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वाडोरने 2-0 ने केली मात

इक्वाडोरचा कर्णधार वेलेन्सियाने नोंदवले दोन्ही गोल
Qatar vs Ecuador
Qatar vs EcuadorDainik Gomantak

Qatar vs Ecuador: फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात इक्वाडोरने यजमान कतार संघाचा 2-0 असा पराभव केला. इक्वाडोरकडून दोन्ही गोल कर्णधार वेलेन्सियाने नोंदवले. पुर्ण 90 मिनिटांच्या खेळात ही आघाडी कायम राहिली. (FIFA World Cup 2022)

Qatar vs Ecuador
FIFA World Come Opening Ceremony: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या उद्गाटन सोहळ्यातून कतारच्या संस्कृतीचे दर्शन

फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान कतार विरूद्ध इक्वाडोर असा सामना झाला. या सामन्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. कारण सामन्यापुर्वी दोन दिवस हा सामना फिक्स झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

या सामन्यात इक्वाडोरने कतारवर हाफटाईमच्या आधीच 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतरचा खेळ संथ झाला. इक्वाडोरने डिफेन्स करण्यावर भर दिला. जणू दोन गोलमुळे ते समाधानी आहेत. तर कतारनेही इक्वाडोररला गोल करण्यापासून रोखले आहे. फर्स्ट हाफमध्ये इक्वाडोरचा वेगवान खेळ पाहायला मिळाला. त्या तुलनेत दुसरा हाफ निराशाजनक आहे. इक्वाडोरकडून दोन्ही गोल कर्णधार वेलेन्सिया याने नोंदवले. त्याने पहिला गोल 16 व्या आणि दुसरा गोल 31 व्या मिनिटाला केला.

Qatar vs Ecuador
FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये खेळाडुंना एका सामन्यासाठी किती मोबदला मिळतो?

कतार या स्पर्धेचा यजमान आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात यजमानांचा पराभव नको म्हणून कतारने इक्वाडोरच्या खेळाडुंना जवळपास 60 कोटी रूपयांची लाच दिल्याची अफवा समोर आली होती. यापुर्वी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका संघ यजमान होता आणि त्यांना ग्रुप लेव्हलच्या पुढचा टप्पा गाठता आला नव्हता. तेच आ्व्हान कतारसमोर असणार आहे. दरम्यान, फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात 1992 नंतर यजमान देशाने पहिला सामना गमावलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com