झिम्बाब्वेला पराभूत करत पाकिस्तान संघानं ''या'' कृतीमुळे जिंकली सर्वांची मने

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

पाकिस्तान संघांचा कर्णधार बाबर आझमने हॉटेल कर्मचाऱ्यांना टी-शर्ट आणि काही भेटवस्तू दिल्या आहेत.

दोन्ही कसोटीमध्ये झिम्बॉब्वेला (Zimbabwe) नमवून पाकिस्तानने (Pakistan) 2-0 ने मालिका जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 147 धावांनी विजय मिळवत पाकिस्तान संघानं मालिकेत शानदार प्रदर्शन केले. या कसोटी मालिकेनंतरही पाकिस्तान संघ (Pakistan cricket team) पुन्हा एकदा एका कृतीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर पाकिस्तान संघानं हॉटेल कर्मचाऱ्यांना जर्सी आणि काही भेटवस्तू दिल्या आहेत.

पाकिस्तान संघांचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) हॉटेल कर्मचाऱ्यांना टी-शर्ट आणि काही भेटवस्तू दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक क्रिकेट चाहत्यांनी लाईक केले असून अनेकांनी व्हिडिओ शेअरही केला आहे. (Defeating Zimbabwe Pakistan won the hearts of all due to this action)

SL vs IND: श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार कोण? दोन दिग्गज खेळाडू शर्यतीत

पाकिस्तान संघाने या केलेल्या कृतीमुळे भारतीयांनीही (India) कौतुक केलं आहे. काही क्रिकेट चाहत्यांना भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य राहणेची आठवण झाली. अजिंक्य राहणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली भारतीय संघानं कसोटीत अफगाणिस्तान संघाला एक डाव आणि 262 धावांनी पराभूत केले होते. भारताच्या या विजयानंतर अजिंक्य राहणेनं भारतीय संघासोबत अफगाणिस्तानच्या सर्व खेळांडूना आमंत्रित करुन चषकासह फोटो काढला होता.

ICC: पाकिस्तानचा बाबर आझम ठरला एप्रिल महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू

कसोटी मालिका विजयासह बाबर आझम पहिले चार कसोटी सामने जिंकणारा पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघानं दक्षिण आफ्रिकेविरुध्द दोन व झिम्बॉव्बेविरुध्दचे दोन कसोटी सामने जिंकले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाचा फलंदाज असलेल्या बाबर आझमला हा विजयरथ सुरु ठेवण्याची संधी आहे. पाकिस्तान संघाला वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशविरुध्द दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. यावर्षी पाकिस्तान संघानं दक्षिण आफ्रिकेला कसोटी आणि टी-ट्वेन्टी सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. पाकिस्तान संघाची सहा किंवा त्यापेक्षा अधिक मालिका जिंकण्याची ही सहावी वेळ आहे.
 

संबंधित बातम्या