IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

इंडियन प्रीमीयर लीग च्या 14 व्य हंगामाला शुक्रवार(9 एप्रिल) पासून सुरुवात झाली. या हंगामातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघांत मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला.

इंडियन प्रीमीयर लीग च्या 14 व्य हंगामाला शुक्रवार(९ एप्रिल) पासून सुरुवात झाली. या हंगामातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघांत मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 189 धावांचे लक्ष दिल्ली समोर ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने 18.4 षटकांतच  7 विकेट्सने सामना जिंकला. दिल्लीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली ती दिल्लीची सलामीची जोडी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी. त्यांनी पहिल्या विकेटसाठी  11 षटकांमध्येच 100 धावा करून दिल्लीला ताबडतोब सुरवात करून दिली होती. त्यानंतर त्यांची पार्टनरशिप रंगात असताना पृथ्वी शॉ 14 व्या षटकात 72 धावांवर ड्वेन ब्रावोच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

गोवा: निवृत्तीनंतर स्वप्नीलची बॅट पुन्हा कडाडली

परंतु शिखरने पुढे आपला संभाव्य खेळ कायम ठेवला होता. शिखर धवनने आपल्या संपूर्ण खेळीत 10 चौकार आणि  2 षटकराच्या मदतीने 85 धावा करून आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्यापूर्वी दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने 20 षटकांत 7 बाद 188 धावा केल्या करून  दिल्लीला 189 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईकडून खेळताना सुरेश रैनाने अर्धशतक केले तर मोईन अलीने 36 धावा केल्या. मागच्या हंगामात सुरेश रैना खेळू शकला नव्हता. पण काल सुरेश रैनाने अर्धशतक करत दमदार पुनरागमन केले आहे.  

विंगर लिस्टन कुलासोला कोलकात्यातील एटीके मोहन बागानने केले करारबद्ध 

दरम्यान, कालचा सामना हा गुरु विरुद्ध चेला असा झाला. आजचा सामना हा संराइजर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. दोन्हीही  संघ तितक्याच ताकदीचे आहेत. त्यामुळे विजय कोणाचा होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

संबंधित बातम्या