दिल्ली संघाच्या नेतृत्वात बदल; जाणून घ्या कोणाकडे गेले कर्णधारपद

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

नुकत्याच पार पडलेल्या भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेत डाव्या खांद्याला दुखापतग्रस्त असल्याने श्रेयस अय्यरकडे असलेली कर्णधार पदाची जबाबदारी आता दुसऱ्या खेळाडूकडे देण्यात आली आहे. देण्यात आली आहे.

एप्रिल 2021 पासून सुरू होणार्‍या 'इंडियन प्रीमियर लीग 2021' (आयपीएल) च्या आगामी हंगामासाठी सर्व संघ जोरदार तयारी करत असल्याचे दिसते आहे. त्यातच आज  दिल्लीच्या संघाने विकेटकीपर फलंदाज रूषभ पंतला संघाच्या कर्णधार पदाची जाबाबदारी देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेत डाव्या खांद्याला दुखापतग्रस्त असल्याने श्रेयस अय्यरकडे असलेली कर्णधार पदाची जबाबदारी आता रुषभ पंतकडे देण्यात आली आहे.(Delhi capital team announced the name of new captain)

याप्रसंगी डीसीचे अध्यक्ष व सह-मालक किरणकुमार या विषयावर बोलताना सांगितले की, “श्रेयस (Shreyas Iyer) लवकरच लवकरच बरा होऊन परत यावा अशी आपली इच्छा आहे, कारण  श्रेयसच्या नेतृत्वाखाली आमची टीम नव्या उंचीवर पोहोचली आहे त्याची अनुपस्थिती आमच्यासाठी दुर्दैवी आहे. त्याच्या अनुपस्थितीत यावर्षी संघाचे नेतृत्व फ्रँचायझीने रुषभ पंतला निवडले आहे. दरम्यान ही परिस्थिती नक्कीच दुर्दैवी असली तरी रुषभ पंत साठी ही उत्तम संधी आहे'' असे म्हणत त्यांनी ऋषभ पंतला नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा देखील दिल्या.  

IPL 2021: CSK च्या जर्सीसाठी 15 बाटल्याचा वापर; जाणून घ्या कारण

कर्णधार पदाची जबाबदारी मिळाल्याने रूषभ पंतने (Rushabh Pant) आनंद व्यक्त केला. यावेळी  ''आपण दिल्लीतच (Delhi) वाढलेलो असून, आयपीएलचा सहा वर्षांचा प्रवास देखील याच दिल्लीत पूर्ण केला आहे. त्यामुळे या संघाचे नेतृत्व करायला मिळने हे माझे एक दिवस स्वप्न होते, ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. संघाच्या मालकांनी आणि निर्णयप्रक्रियेतील मंडळींनी  आपल्याला या पदासाठी पात्र समजले त्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानतो'' असे म्हणत  रुषभ  पंतने आपण संघासाठी उत्तम सादरीकरण करण्यासाठी आतुर असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या