MUM vs DEL, WPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने उडवला मुंबई इंडियन्सचा धुव्वा, 9 षटकात केल्या 110 धावा

Women’s Premier League 2023: महिला प्रीमियर लीगच्या 18 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव केला.
Shafali Verma
Shafali VermaDainik Gomantak

MUM vs DEL Women’s Premier League 2023: महिला प्रीमियर लीगच्या 18 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव केला. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 9 षटकांत 110 धावांचे लक्ष्य गाठले.

दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 109 धावाचं करु शकला. दिल्लीने नऊ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 110 धावा करुन सामना जिंकला.

Shafali Verma
WPL 2023: 'चुकीचा अर्थ लावला आणि...', गुजरात जायंट्सने बाहेर केलेल्या डॉटीनच्या दाव्याने नवा गोंधळ

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव केला. दिल्लीने केवळ नऊ षटकांत 110 धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंग, अॅलिस कॅप्सी आणि शफाली वर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. तिघींनीही शानदार फलंदाजी केली.

Shafali Verma
WPL 2023: युपी वॉरियर्सचं प्लेऑफचं तिकीट पक्क! अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरात जायंट्सचा पराभव

तसेच, एलिस कॅप्सीने सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. 17 चेंडूंच्या खेळीत तिने फक्त एक चौकार मारला. कॅप्सीच्या बॅटमधून पाच षटकार आले. कर्णधार मेग लॅनिंगने 22 चेंडूत 32 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. तिने चार चौकार मारले.

तर, शफाली वर्माने 15 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. लॅनिंग आणि शफाली यांनीही प्रत्येकी एक षटकार ठोकला. दुसरीकडे, हीली मॅथ्यूजने मुंबईसाठी चांगली कामगिरी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com