WPL 2023, DC vs RCB: स्मृतीची RCB पाचव्यांदा हारली रे...! दिल्लीने मारली बाजी

Delhi Capitals: महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 चा 11 वा सामना सोमवारी खेळला जात आहे, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात सामना पार पडला.
Delhi Capitals
Delhi CapitalsDainik Gomantak

WPL 2023, DC vs RCB: महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ला आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदानावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला.

आरसीबीने 151 धावांचे लक्ष्य ठेवले, जे डीसीने दोन चेंडू राखून पूर्ण केले. आरसीबीचा स्पर्धेतील हा सलग पाचवा पराभव आहे. मानधना ब्रिगेड विजयाचे खाते उघडण्यासाठी तळमळत आहे.

तत्पूर्वी, आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 150 धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या आरसीबीची (RCB) सुरुवात काही खास नव्हती. कर्णधार स्मृती मानधना (8) पाचव्या षटकात शिखा पांडेची बळी ठरली.

शिखाने नवव्या षटकात सोफी डिवाइनला (21) बोल्ड केले. हीदर नाइट (11) फलंदाजी करु शकली नाही. तिला तारा नॉरिसने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी आघाडी घेतली.

Delhi Capitals
WPL 2023: लकी हरमनप्रीत! स्टम्पला बॉल लागूनही MI कॅप्टन राहिली 'नॉटआऊट', नक्की भानगड काय?

दुसरीकडे, दोघींनी चौथ्या विकेटसाठी 74 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शिखाने 19व्या षटकात रिचाला बाद करत ही भागीदारी मोडली. रिचाने 16 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या.

पेरीने 52 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार मारले. श्रेयंका पाटील 4 चेंडूत 4 धावा करुन नाबाद राहिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com