आज दिल्ली आणि बंगळूरमध्ये शेवटची झुंज

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

दिल्लीने गेल्या चारही लढती गमावल्या आहेत, तर बंगळूरला पराभवाच्या हॅट््ट्रिकला सामोरे जावे लागले आहे. 

अबू धाबी-  काही आठवड्यांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा  आयपीएल प्ले ऑफमधील प्रवेश निश्‍चित होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. प्रतिस्पर्ध्यातील आजची लढत विजेत्या संघाचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्‍चित करेल, पण त्याचबरोबर पराभवाची मालिका खंडित झाल्याचेही त्यांना समाधान असेल.

दिल्लीने या स्पर्धेत सुरुवातीच्या नऊपैकी सात लढती जिंकल्या होत्या, तर बंगळूर नऊपैकी सहा सामने. पण दोन आठवड्यांत परिस्थिती बदलली. अजूनही प्रतिस्पर्धी आघाडीच्या तीन संघात आहेत, पण त्याचवेळी उद्याच्या लढतीतील पराजित संघ कदाचित स्पर्धेबाहेरही असू शकेल. दिल्लीने गेल्या चारही लढती गमावल्या आहेत, तर बंगळूरला पराभवाच्या हॅट््ट्रिकला सामोरे जावे लागले आहे. 

प्ले ऑफ निश्‍चित धरल्याचा फटका दिल्लीस बसत आहे. त्यामुळे वरिष्ठ खेळाडू जबाबदारी पार पाडतील, अशी अपेक्षा सपोर्ट स्टाफला आहे.  दरम्यान, विराट कोहली आणि एबी डिव्हिल्यर्स यांच्यावर बंगळूर संघाचे यशापयश अवलंबून आहे. स्पर्धेच्या सुरुवातीस प्रभावी वाटलेल्या बंगळूर गोलंदाजीचा सूरही हरपला आहे. 
 

संबंधित बातम्या