दिल्लीच्या वेगवान गोलंदाजाचा कोरोना अहवाल खोटा

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

विलगीकरणामध्ये दिवस घालवल्यानंतर तो मैदानात येण्याची प्रतीक्षा करत होता.

कोरोनाचे तीन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दिल्ली कॅपिटलचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे शुक्रवारी संघाच्या बायो बबलमध्ये सामील झाला. नॉर्टजेला चुकीच्या कोरोना अहवालामुळे, त्याला बराच काळ विलगीकरणात राहायची वेळ आली. गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात संघाचा सहकारी कॅगिसो रबाडा सहभागी झाला होता.  आमच्या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाचा विलगीकरण कालावधी संपला आहे. कोरोनाच्या खोट्या अहवालानंतर एनरिच नार्टजेचे तीन कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशा प्रकारचे ट्विट दिल्ली कॅपिटल्सने केले आहे. (Delhi fast bowler's corona report is false)

पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर एकटा विराटच पडतोय भारी

एनरिच नॉर्टजे  आता टीमच्या बायो बबल सोबत आहे. विलगीकरणामध्ये दिवस घालवल्यानंतर तो मैदानात येण्याची प्रतीक्षा करत होता. सर्वांसोबत जेवण करताना छान वाटले. मैदानामध्ये येण्याची वाट पाहत असल्याचे एनरिच म्हणाला. नॉरजे दिल्लीचा आघाडीचा गोलंदाज समजला जातो त्याने मागच्या मोसमात 22 बळी घेतले होते. आता नॉर्टजे संघात आल्यामुळे दिल्लीची गोलंदाजी अजून बळकट झाली आहे. दिल्लीने मागचा सामना खराब गोलंदाजीमूळे गमवाल होता. 

अक्सर पटेलच्या जागी शम्स मुलानी संघात 
दिल्लीने चालू हंगामात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि पहिला सामना जिंकून दोन गुणांवर आहेत. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध त्याने आपला दुसरा सामना तीन विकेट्सने गमावला. दरम्यान, दिल्लीच्या संघाने अक्षर पटेलच्या जागी अष्टपैलू शम्स मुलानीला तात्पुरते संघात स्थान दिले आहे. मुलाणी घरगुती क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळत असून आतापर्यंत 10 प्रथम श्रेणी, 30 यादी ए आणि 25 टी -20 सामने खेळला आहे. आयपीएलमधील हा मुलानीचा पहिला अनुभव आहे. 

संबंधित बातम्या