दिल्ली कॅपिटल्सचा 'हा' स्टार गोलंदाज कोरोनाच्या विळख्यात

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

दिल्ली संघासाठी हा मोठा धक्का आहे.

दिल्ली कॅपिटल संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दिल्ली संघासाठी हा मोठा धक्का आहे. एनरीच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. पण आता कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर एनरिचला विलगीकरणात ठेवले आहे. दिल्लीने पहिल्या सामन्यात सीएसकेला पराभूत करून स्पर्धेत चांगली सुरुवात केली. दिल्लीचा संघ राजस्थान रॉयल्सशी पुढील सामना खेळणार आहे. नॉर्टजेला कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धेसाठीही हा मोठा धक्का आहे. (Delhi's star bowler infected with corona)

IPL 2021: दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सचा 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

गत मोसमात दिल्लीकडून खेळताना नॉर्टजेने चमकदार कामगिरी केली होती आणि 22 विकेट्स घेतल्या होत्या. नॉर्टजेच्या कामगिरीमुळे दिल्लीच्या टीमने आयपीएल 2020 मध्ये अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली होती. एनरीच सोबत दिल्लीचा स्टार गोलंदाज कगिसो रबाडा पण होता. परंतू त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दोघंही आता मुंबईमध्ये विलगीकरणात आहेत.

एनरीच नॉर्टजे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने  बीसीसीआयने आखलेल्या बायो बबल क्षेत्रात विलगीकरणात आहे. नॉर्टजे पाकिस्तानविरुद्धची मालिका सोडून आयपीएल खेळण्यासाठी भारतात आला होता. तसेच नॉर्टेचा विलगीकरणाचा कालावधी देखील पूर्ण झाला होता. यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची  टीम रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळत आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे यंदा आयपीएलमधून बाहेर पडला आहे. सीएसकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी शानदार फलंदाजी करून दिल्लीला विजय मिळवून देण्यात विशेष भूमिका बजावली होती. पहिल्या सामन्यात धवनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते.

IPL 2021 SRH vs RCB: आज हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर सामना; 'या' खेळाडूच...

दरम्यान, याअगोदर दिल्ली कॅपिटल्सच्या अक्सर पटेलला कॉरोनची लागण झाली होती. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या देवदत्त पडीक्कललाही कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर केकेआरचा सलामीवीर नितीश राणा देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतू त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्याने केकेआरकडून खेळताना या हंगामात दोन अर्धशतक केले आहेत.  

संबंधित बातम्या