Panaji Gymkhana Members League: धेंपो चॅलेंजरचा प्रायोरिटी टायटन्सवर 51 धावांनी सहज विजय

कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर पार पडला सामना
Dempo Challengers
Dempo ChallengersDainik Gomantak

Panaji Gymkhana Members League : धेंपो चॅलेंजरने गतवर्षी हुकलेले पणजी जिमखाना मेंबर्स लीग (PGML) क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यंदा दिमाखात प्राप्त केले. रविवारी अंतिम लढतीत त्यांनी प्रायोरिटी टायटन्सवर 51 धावांनी सहज मात केली.

धेंपो संघाच्या विजयात किरण शिरवईकर याचे शानदार अष्टपैलूत्व निर्णायक ठरले. कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर धेंपो चॅलेंजरने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकांत 7 बाद 163 धावा केल्या.

Dempo Challengers
Mormugao : एमव्ही एमप्रेस पर्यटक जहाजाची वन डे गोवा ट्रिप

किरणने 16 चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांच्या मदतीने आक्रमक 39 धावा केल्या. याशिवाय देविदास खोलकरने 35 धावांचे योगदान दिले. दिनेश अमृते, नकुल म्हामल, आदित्य आंगले, किरण यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर टायटन्सचा डाव 19.1 षटकांत 112 धावांत गुंडाळला.

बक्षीस वितरण वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पणजी जिमखान्याचे अध्यक्ष मनोज काकुले, सचिव राजेश खंवटे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.

Dempo Challengers
ISL Football : एफसी गोवा, ओडिशासाठी उद्याचा महत्त्वाचा सामना

संक्षिप्त धावफलक

धेंपो चॅलेंजर : 20 षटकांत 7 बाद 163 (विजय नागराजन 23, देविदास खोलकर 35, दत्तेश प्रियोळकर 27, किरण शिरवईकर 39, साजू नाईक 13, मुझफ्फर कादरी 1-13, हर्ष पारेख 2-16, मोहन खोलकर 1-22) वि.

प्रायोरिटी टायटन्स : 19.1 षटकांत सर्वबाद 112 (सचिन सरदेसाई 14, प्रज्योत रिवणकर 17, वेदांत नाईक 21, स्वप्नील नास्नोळकर 15, कृष्णा सावंत 16, किरण शिरवईकर 2-19, आदित्य आंगले 2-14, दिनेश अमृते 3-15, नकुल म्हामल 3-16).

बक्षिसांचे मानकरी

- किरण शिरवईकर (धेंपो चॅलेंजर) : अंतिम सामन्याचा व स्पर्धेचा मानकरी, उत्कृष्ट गोलंदाज
- देविदास खोलकर (धेंपो चॅलेंजर) : उत्कृष्ट फलंदाज
- विजेता संघ : धेंपो चॅलेंजर : २ लाख रुपये
- उपविजेता संघ : प्रायोरिटी टायटन्स : १ लाख रुपये

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com