जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत धेंपो क्लब उपांत्य फेरीत

उदितची हॅटट्रिक: एमसीसीला मागे टाकत साळगावकरचीही कूच
Dhempo Club in the semi-finals of the GCA Premier League Cricket Tournament
Dhempo Club in the semi-finals of the GCA Premier League Cricket TournamentDainik Gomantak

पणजी : जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चौगुले स्पोर्टस क्लबला नमविण्यासाठी धेंपो क्लबला मंगळवारी सकाळी 24 चेंडू पुरेसे ठरले. उदित यादवच्या हॅटट्रिकमुळे त्यांनी सामना डाव व 77 धावांनी जिंकून थाटात उपांत्य फेरी गाठली. (Dhempo Club in the semi-finals of the GCA Premier League Cricket Tournament)

Dhempo Club in the semi-finals of the GCA Premier League Cricket Tournament
AIIMS मध्ये 159 पदांसाठी भरती; जाणून घ्या शेवटची तारीख

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर चौगुले क्लबचा दुसरा डाव कालच्या 7 बाद 39 वरून 49 धावांत आटोपला. उदितने डावातील 28व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर सलग फलंदाज बाद करण्याचा पराक्रम साधला. त्याने फेलिक्स आलेमावला यष्टिरक्षक करण वशोदियाकरवी झेलबाद केले, नंतर शदाब खानला त्रिफळाचीत बाद केले, तर कृष्णन उन्नी याला पायचीत पकडून धेंपो क्लबच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सांगे येथील जीसीए मैदानावर अनिर्णित लढतीत साळगावकर क्रिकेट क्लबने गतविजेत्या एमसीसी संघावर पहिल्या डावात 166 धावांची आघाडी प्राप्त केली. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरी गाठणे शक्य झाले.

उपांत्य लढत शुक्रवारपासून

प्रीमियर लीग स्पर्धेतील उपांत्य लढत शुक्रवारपासून (ता. 6) खेळली जाईल. सांगे येथील जीसीए मैदानावर जीनो क्लब विरुद्ध साळगावकर क्लब यांच्यात, तर कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर करिमाबाद क्लब विरुद्ध धेंपो क्लब यांच्यात लढत होईल.

संक्षिप्त धावफलक

चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव 187 व दुसरा डाव : 28 षटकांत सर्वबाद 49 (उदित यादव 2-0-10-3) पराभूत वि. धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव : 313.

साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव : 386 व दुसरा डाव : 57 षटकांत 1 बाद 144 (सुमीरन आमोणकर नाबाद 58, ईशान गडेकर 24, प्रथमेश गावस नाबाद 56, दीप कसवणकर 1-59).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com