गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकरांची अखिल भारतीय सेपॅकटॅकरो महासंघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांची अखिल भारतीय सेपॅकटॅकरो महासंघाच्या चेअरमनपदी काल बिनविरोध निवड झाली. त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा (२०२०-२०२४) असेल.

पणजी  : गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांची अखिल भारतीय सेपॅकटॅकरो महासंघाच्या चेअरमनपदी काल बिनविरोध निवड झाली. त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा (२०२०-२०२४) असेल. महासंघाची वार्षिक आमसभा रविवारी दिल्लीत झाली. उपमुख्यमंत्री कवळेकर हे महासंघाच्या मावळत्या व्यवस्थापकीय समितीत वरिष्ठ उपाध्यक्ष पदी होते.

 

आमसभेच्या व्यासपीठावर मावळते सचिव दहिया, उपाध्यक्ष टी. के. सिंग, नवनिर्वाचीत सचिव व्ही. गौडा, अध्यक्ष एस. आर. प्रेमराज, उपाध्यक्ष बिमल पाल आणि खजिनदार के. बिश्त उपस्थित होते. यावेळी गोवा सेपॅकटॅकरो संघटनेचे सचिव सूरज देसाई व कृष्ण खराडे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय महासंघाच्या कार्यकारिणीत सूरज देसाई यांचीही निवड झाली.

 

सेपॅकटॅकरो हा ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, तसेच राष्ट्रीय स्पर्धेत समावेश असलेला मूळ आशियाई खेळ आहे. हा खेळ २००० मध्ये उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या  अध्यक्षतेखालीच गोव्यात आणला गेला. त्यांच्याच विशेष प्रयत्नांच्या जोरावर हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत सामावण्यात आला आणि अभ्यासक्रमाचा भाग बनला.

 

गोव्यात यशस्वी ठसा

उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात सातवी, दहावी, चौदावी राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धा,  तसेच विविध राष्ट्रीय पातळीवरील सेपॅकटॅकरो स्पर्धा गोव्यात यशस्वीपणे आयोजित करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री कवळेकर यांचे खेळातील चांगले योगदान पाहून त्यांची महासंघाच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट आहे.

 

सेपॅकटॅकरोस नवी दिशा देणार : कवळेकर

दिल्ली येथून उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले, की सेपॅकटॅकरोत गोवा पोलिस संघ यापुढे भाग घेईल. सेनादलातही सेपॅकटॅकरो खेळला जाईल. त्यासंदर्भात माझे केंद्रात संरक्षणमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. सेपॅकटॅखरो खेळाला माझ्या कारकिर्दीत एक नवीन दिशा देण्याचे ध्येय राहील. गोवा या आधीच राष्ट्रीय स्तरावर या खेळात अव्वल राहिलेला असून आता हा खेळ देशात आणखी लोकप्रिय करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.

 

अधिक वाचा :

आयएसएलमध्ये पूर्ण गुण मिळवण्यासाठी एफसी गोवाचा आज नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध लागणार कस

`सुपर सब` मॉरिसियोमुळे आयएसएलच्या लढतीत ओडिशाने जमशेदपूरला 2-2 बरोबरीत रोखले

आयएसएलची केरळा ब्लास्टर्सचा विरूद्ध चेन्नईयीन एफसी साऊथ डर्बी गोलशून्य बरोबरीत

 

संबंधित बातम्या