Junior Badminton Tournament: देविका सिहागला दुहेरी किताब जिंकण्याची संधी

Junior Badminton Tournament News: मुलींत सहाव्या मानांकित उन्नती हुडा हिच्यासमोर पाचव्या मानांकित देविका सिहाग हिचे विजेतेपदासाठी आव्हान असेल.
Devika Sihag
Devika SihagDainik Gomantak

पणजी: अव्वल मानांकित प्रणव राव गंधम आणि द्वितीय मानांकित भारत राघव यांच्यात अखिल भारतीय ज्युनियर ( Under 19 years) मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या एकेरीत अंतिम लढत होईल. मुलींत सहाव्या मानांकित उन्नती हुडा हिच्यासमोर पाचव्या मानांकित देविका सिहाग हिचे विजेतेपदासाठी आव्हान असेल. स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. देविकाला दुहेरी किताबाची संधी आहे. तिने मुलींच्या दुहेरीत ईशरानी बरुआ हिच्यासह अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या उपांत्य लढतीत हरियाणाच्या (Haryana) १४ वर्षीय उन्नतीने चौथ्या मानांकित अनुपमा उपाध्याय हिच्यावर २१-१४, २१-१४ असा विजय प्राप्त केला. तुलनेत दुसऱ्या उपांत्य सामन्यात देविका हिला संघर्ष करावा लागला. एक तास आणि तीन मिनिटे चाललेल्या लढतीत तिने सातव्या मानांकित एस. रक्षिता श्री हिला २२-२४, २१-१३, २१-११ असे नमविले. देविकाने मुलींच्या (Girls) दुहेरीची अंतिम फेरी गाठताना ईशरानी हिच्यासह नव्या कंदेरी व रक्षिता जोडीस एक तास २१ मिनिटांत १९-२१, २१-१६, २१-१५ असे पराभूत केले.

Devika Sihag
Online National Junior Chess: गोव्याचा नीतिश बक्षीसप्राप्त खेळाडूंत

प्रणवचा धडाकेबाज खेळ

मुलांच्या एकेरीतील उपांत्य लढतीत तेलंगणच्या अव्वल मानांकित प्रणव राव गंधम याने धडाकेबाज खेळ केला. स्मॅशेसचा खुबीने वापर करत त्याने हरियानाच्या मनराज सिंग याला ५२ मिनिटांत २१-१६, २१-१९ फरकाने नमविले. दुसऱ्या उपांत्य लढतीत द्वितीय मानांकित भारत राघव याने तन्मय बिकाश बरुआ याला २१-९, २१-१७ असे हरविले.

इतर उपांत्य निकाल

मिश्र दुहेरी के. सात्विक रेड्डी व वैष्णवी खांडकेकर वि. वि. समरवीर व राधिका शर्मा २२-२०, २१-१६, विग्नेश थाठीनेनी व श्री साई श्राव्या लक्कमराजू वि. वि. दिव्यम अरोरा व रिद्धी कौर तूर २१-९, २१-१३.

मुलगे दुहेरी: दर्शन पुजारी व अभिनव ठाकूर वि. वि. निकोलस नॅथन राज व तुषार सुवीर २१-१०, २१-१३, दिव्यम अरोरा व मयांक राणा वि. वि. प्रभजीतसिंग छाब्रा व अभिषेक मोंडलिका व्यंकट १५-२१, २१-१७, २१-१४

Devika Sihag
All England Open Badminton 'लक्ष्य' सेन 21 वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवणार?

मुली दुहेरी: ज्ञानदा कार्तिकेयन व सानिया सिकंदर वि. वि. जी. कनिष्का व एन. धन्या २१-७, २१-१२.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com