धेंपो क्लबचा कोविड योद्ध्यांना सलाम !

dainik gomantak
शनिवार, 16 मे 2020

``नव्या मोसमात, वर्षभर धन्यवाद देणारा हा संदेश आमचे सर्व संघ, सीनियर आणि युवा विकास संघावर प्रदर्शित असेल.``

-श्रीनिवास धेंपे,

पणजी,

 कोरोना विषाणू महामारीत प्रतिकुल परिस्थिती कार्यरत असलेल्या योद्ध्यांना पाच वेळच्या माजी राष्ट्रीय विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने सलाम केला आहे. `थँक यू गोवास कोविड वॉरियर्स` या शब्दांत धन्यवाद देणाऱ्या `गोल्डन ईगल्स` संघाच्या नव्या खास जर्सीचे गुरुवारी अनावरण झाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंगमुख्य सचिव परिमल राय यांच्या हस्ते गुरुवारी समाज अंतर पाळत जर्सीचे अनावरण झाले.

कोविड-१९ विरोधी लढ्यात भाग घेताना धेंपो उद्योगसमूहाने पीएम केअर्स फंडमध्ये एक कोटी रुपये, तर सीएम कोविड फंडमध्ये २० लाख रुपये दिले आहेत. कोविड योद्ध्यांना सलाम करणाऱ्या धेंपो क्लबच्या नव्या जर्सीवर धन्यवाद देणारा संदेश पुढील भागात असून मुख्य पुरस्कर्ते धेंपो हे नाव पाठीमागे असेल. महामारीच्या युद्धात आघाडीवर लढणाऱ्या पुरुष व महिलांच्या कार्याचे कौतुक करण्याचा हा नम्र प्रयत्न असल्याचे धेंपो क्लबने पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

 

``नव्या मोसमात, वर्षभर धन्यवाद देणारा हा संदेश आमचे सर्व संघ, सीनियर आणि युवा विकास संघावर प्रदर्शित असेल.``

-श्रीनिवास धेंपे,

धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष

संबंधित बातम्या