धेंपो क्लब विजयपथावर; दहा खेळाडूंसह खेळत मनोरा संघावर मात

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मार्च 2021

धेंपो क्लबच्या विजयात बचावपटू एडविन व्हिएगस याने दोन गोल केले.

पणजी: (Dhempo Club on the way to victory Overcoming the tower team playing with ten players) गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत धेंपो क्लबने शुक्रवारी दहा खेळाडूंसह खेळूनही चमकदार विजय नोंदविला. त्यांनी यूथ क्लब मनोरा संघाला 3-0 फरकाने हरविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. धेंपो क्लबच्या विजयात बचावपटू एडविन व्हिएगस याने दोन गोल केले. त्याने पहिला गोल 17व्या, तर दुसरा गोल 45व्या मिनिटास केला. धेंपो क्लबचा तिसरा गोल सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये बदली खेळाडू बीव्हन डिमेलोने नोंदविला. सामन्याच्या उत्तरार्धाच्या सुरवातीस धेंपो क्लबचा एक खेळाडू कमी झाला. मनोरा संघाच्या जेसन बार्बोझा याला धोकादायकरीत्या पाडल्यामुळे रेफरीने धेंपो क्लबच्या कीर्तिकेश गडेकर याला थेट रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. (Dhempo Club on the way to victory Overcoming the tower team playing with ten players)

गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेत कळंगुटला सेझा अकादमीने रोखले

धेंपो क्लबचा हा आठ लढतीतील चौथा विजय ठरला. त्यामुळे 14 गुण झाले आहेत. यूथ क्लब मनोरा संघास पाचव्या पराभवास सामोरे जावे लागले, त्यामुळे सात लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले. मनोरा क्लबच्या आदित्य डिक्रूझने धेंपो क्लबच्या डेस्मन परेरा याला धोकादायक टॅकल केल्यानंतर धेंपो क्लबला फ्रीकिक फटका मिळाला. यावेळी पेद्रू गोन्साल्विसच्या सेटपिसेसवर एडविन व्हिएगस याने सुरेख हेडिंग साधले. त्यानंतर जेसन बार्बोझा याला अचूक नेम साधता आला नाही, त्यामुळे मनोरा संघाला बरोबरी साधता आली नाही.

पूर्वार्धाच्या शेवटच्या मिनिटास एडविन व्हिएगस याने पुन्हा भेदक हेडिंग साधल्यामुळे धेंपो क्लबच्या खाती 2-0 आघाडी जमा झाली. इंज्युरी टाईममध्ये बीव्हनने मनोरा संघाच्या गोलरक्षकास सहजपणे चकविल्यामुळे धेंपो क्लबची आघाडी आणखीनच भक्कम झाली.
 

संबंधित बातम्या