गोवा प्रोफेशनल फुटबॉल लीग : धेंपो स्पोर्टस क्लबची सेझा अकादमीवर सहज मात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अनुभवी स्ट्रायकर उत्तम राय याने धेंपो स्पोर्टस क्लबमधील पुनरागमन सोमवारी यशस्वी ठरविले. त्याच्या दोन गोलच्या बळावर माजी विजेत्यांनी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सेझा फुटबॉल अकादमीवर 4 - 1 फरकाने सहज मात केली.

पणजी : अनुभवी स्ट्रायकर उत्तम राय याने धेंपो स्पोर्टस क्लबमधील पुनरागमन सोमवारी यशस्वी ठरविले. त्याच्या दोन गोलच्या बळावर माजी विजेत्यांनी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सेझा फुटबॉल अकादमीवर 4 - 1 फरकाने सहज मात केली.

धेंपो क्लबचे वर्चस्व राहिलेला सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. बीव्हन डिमेलो याने सामन्याच्या नवव्या मिनिटास धेंपो क्लबचे गोलखाते उघडले. त्यानंतर पूर्वार्धातील इंज्युरी टाईममध्ये उत्तमने धेंपो क्लबची आघाडी दोन गोलने वाढविली. शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल नोंदवून धेंपो क्लबने मोठा विजय साकारला. गौरव वायगणकर याने 80व्या मिनिटाल लक्ष्य साधल्यानंतर 83 व्या मिनिटास उत्तमने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. त्यापूर्वी 53व्या मिनिटास कुणाल साळगावकरने सेझा अकादमीची पिछाडी एका गोलने कमी केली होती.

ISL: बंगळूरला ईस्ट बंगालचा धोका

दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना होता. धेंपो क्लबच्या खाती आता तीन गुण जमा झाले आहेत. सेझा फुटबॉल अकादमीने उत्तरार्धात धेंपो क्लबला झुंज दिली, पण त्यांना सदोष नेमबाजीमुळे विशेष यश लाभले नाही.

स्पर्धेत मंगळवारी (ता. 2) धुळेर स्टेडियमवर साळगावकर एफसी व चर्चिल ब्रदर्स यांच्यात सामना होईल.

 

संबंधित बातम्या