सुट्टी एन्जॉय करणाऱ्या धोनीचा 'दमदार' लूक सोशल मिडियावर तूफान व्हायरल

सुट्टी एन्जॉय करणाऱ्या धोनीचा 'दमदार' लूक सोशल मिडियावर तूफान व्हायरल
mahi 1.jpg

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सोशल मिडियावर (Social media) कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो पत्नी साक्षी (Sakshi) आणि मुलगी झिवा (Ziva) यांसह सुट्टीवर आहे. लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल झाल्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) गेला आहे. शिमल्यात धोनी सुट्टीचा आनंद घेत आहे. धोनी पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याचा नवीन लूक. धोनीचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो नवीन लूकमध्ये दिसत आहे. धोनीने आपली मिशी वाढवली आहे.(Dhoni energetic look enjoying the holiday storm on social media)

धोनी शिमल्यामध्ये (Shimla) पोहोचल्यानंतर त्याच्या चाहत्यांना भेटला आहे. त्याच्यासोबत अनेकांनी फोटो काढले. धोनीने शिमल्याला जाण्यापूर्वी रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला. धोनी सोशल मिडियावर फार कमी सक्रीय असतो, परंतु त्याची पत्नी साक्षी सोशल मिडियावर बऱ्याचदा फोटो- व्हिडिओ शेअर करते. या व्हिडिओमध्ये धोनीही असतो. साक्षीने सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी नवीन घोड्यासह दिसला आहे. धोनीने अलीकडेच स्कॉटलंडमधून (Scotland) शेटलंड पोनी जातीचा नवीन घोडा विकत घेतला आहे. विशेष म्हणजे हा घोडा 2 वर्षाचा सर्वात लहान जातीपैंकी एक आहे. त्याची उंची फक्त 3 फूट आहे. धोनीकडे पहिल्यापासूनचं चेतक नावाचा घोडा आहे, जो तो 11 महिन्यांचा आहे.

कप्तान म्हणून महेंद्रसिंह धोनी..
धोनी हा टीम इंडियाकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने 332 सामन्यांचे नेतृत्व केले होते. यापैकी त्याने 178 सामन्यामध्ये विजय संपादन केला. आयपीएलमध्ये चेन्नई सुपुर किंग्जला (Chennai Super Kings) तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. याशिवाय त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये (Champions League) टी-ट्वेन्टी चे विजेतेपदही जिंकले आहे. 2021 च्या आयपीएल (IPL) हगांमात धोनीाच्या सुपर किंग्ज संघ गुणतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र यंदा कोरोनामुळे (Covid 19) आयपीएलचा हंगाम 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. मात्र उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन युएईत 19 सप्टेंबरपासून होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MS DHONI FAN PAGE (250k) (@msdhoni.fan07)

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com