महाराष्ट्राच्या ऋतुराजचे धोनीकडून कौतुक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

चेन्नई संघातील प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असताना सलग दुसरे अर्धशतक करणाऱ्या महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कौतुक केले आहे.

दुबई :  चेन्नई संघातील प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असताना सलग दुसरे अर्धशतक करणाऱ्या महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कौतुक केले आहे. आयपीएलमध्ये खेळत असलेल्या युवकांमधला हा सर्वोत्तम गुणवत्ता असलेला फलंदाज आहे, असे धोनीने म्हटले आहे.

आम्ही त्याला नेटस्‌मध्ये फलंदाजी करताना पाहिले, पण येथे (दुबईत) येताच तो कोरोना बाधित झाला. या संसर्गातून बाहेर येण्यास साधारतः १० ते १२ दिवस लागतात, परंतु ऋतुराजसाठी २० दिवस लागले. त्यामळे पुरेसा सराव करण्यासाठी त्याला वेळ मिळाला नाही. तरीही त्याने दाखवलेला फॉर्म कमालीचा आहे, अशा शब्दांत धोनीने ऋतुराजचे कौतुक केले.

ऋतुराज मितभाषी आहे, त्यामुळे अशा खेळाडूंबाबत अंदाज बांधणे कठीण असते. पण असे खेळाडू मैदानात उरतात आणि सहजसुंदर खेळ करतात, तेव्हा त्यांच्या गुणवत्तेची जाणीव होते, असे धोनीने सांगितले.
ऋतुराज पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. तरीही त्याने आत्मविश्‍वास कमी होऊ दिला नव्हता.

संबंधित बातम्या