Goa: स्व.दिगंबर रामा नाईक स्मृती चषकावर 'Rising FC' संघाने कोरले नाव

अंतिम सामन्यात बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे उपस्थित होते.
Goa: स्व.दिगंबर रामा नाईक स्मृती चषकावर 'Rising FC' संघाने कोरले नाव
Digambar Rama Naik Memorial Cup won by Rising FC teamDainik Gomatak

मोरजी: चोन्साई-पार्से येथील डॅडी स्पोर्टींग क्लब तर्फे आयोजित केलेल्या स्व.दिगंबर रामा नाईक स्मृति चषक आंतर ग्राम फुटबॉल (Football) स्पर्धेत रायझिंग एफ सी संघाने यजमान डॅडी स्पोर्टीगचा पराभव करून स्पर्धेचे विजेते पद पटकावले. यजमान डॅडी स्पोर्टीग ला उपविजेतेपद मिळाले. (Digambar Rama Naik Memorial Cup won by 'Rising FC' team)

आजुचो ओहळ चोंनसाई पार्से मैदानावर पार पडलेल्या या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे उपस्थित होते.याशिवाय पार्सेच्या सरपंच सौ.प्रगती सोपटे,समाज सेवक शांताराम नाईक,डॅडी स्पोर्टीगचे रामा नाईक आदी उपस्थित होते.

Digambar Rama Naik Memorial Cup won by Rising FC team
Tokyo Olympic: प्रश्र्नमंजुषा स्पर्धेत सालसेत तालुक्यातील दोघांना 'गोल्ड'

प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून डॅडी स्पोर्ट्स क्लबच्या दीपक मोहन कलांगुटकर याला बक्षीस देण्यात आले.या स्पर्धेत यंग जीनेर, रायजिंग एफ सी,डॅडी स्पोर्टीग ,रशियन बॉईज, एम बॉईज आदी संघांनी भाग घेतला होता.

यावेळी चोनसाई पार्सेच्या डॅडी स्पोर्टीग क्लबतर्फे आयोजित केलेल्या आंतर ग्राम फुटबॉल स्पर्धेत विजेता ठरलेल्या रायझिंग क्लब आणि उपविजेत्या डॅडी संघा सोबत पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष तथा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, पार्सेच्या सरपंच सौ प्रगती सोपटे, आयोजक क्लबचे रामा नाईक व इतर लोक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com