‘दिलीप सरदेसाई’ पुरस्कारावर कोरोनाचे सावट

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

क्रीडा व युवा व्यवहार खात्याची प्रक्रिया रखडलीगतवर्षीही पुरस्कार नाही

किशोर पेटकर

पणजी

गोव्यात जन्मलेले भारताचे महान कसोटी क्रिकेट फलंदाज दिलीप सरदेसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी नोंदविणाऱ्या गोमंतकीय क्रीडापटूचा क्रीडा नैपुण्य पुरस्काराने गौरव केला जातो. क्रीडा व युवा व्यवहार खात्यास गतवर्षी या पुरस्कारासाठी लायक खेळाडू गवसला नाहीतर यंदाच्या पुरस्कारावर कोरोना विषाणू महामारीचे सावट आहे.

सलग दुसऱ्या वर्षी दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्काराचे वितरण न होण्याची शक्यता आहे. दरवर्षी या पुरस्कारासाठी मे महिन्यात सीनियर गटातील खेळाडूंकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू होतेपण यंदा कोविड-१९च्या धास्तीने क्रीडा व युवा व्यवहार खात्याने अजून पुरस्काराची प्रक्रिया हातीच घेतलेली नाही. राष्ट्रीय क्रीडा दिनी २९ ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण करण्यावर राज्य सरकारचा भर असतोयंदा हा मुहूर्त चुकण्याचे संकेत आहेत.

क्रीडा खात्यातील सूत्रांच्या माहितीनुसारसध्या गोव्यात कोविड-१९चा उद्रेक आहे. सरकारने खर्चकपातही सुचविली आहे. बिकट परिस्थितीत पुरस्कार समारंभ काही काळापुरते स्थगित ठेवण्याबाबत क्रीडा खात्यात मतैक्य आहे. त्यामुळे दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कारतसेच क्रीडापटूंच्या बक्षीस रक्कम योजनेची फाईल प्रगती करू शकली नाही. कदाचित पुढील महिन्यात पुरस्कार वितरण प्रक्रियेला गती मिळू शकतेपण ठोस काहीच नाही.

खात्यातील एका ज्येष्ठ क्रीडा अधिकाऱ्याने सांगितलेकी ‘‘२०१८-१९ सालचा दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कार निकषपात्र खेळाडू नसल्याने देण्यात आला नव्हता. दोन वेळा आवाहन केल्यानंतरकाही मोजकेच अर्ज आले होतेपण ते पुरस्काराचे निकष पूर्ण करणारे नव्हतेत्यामुळे पुरस्कार दिला नाही. त्यापूर्वी २०१६-१७ सालासाठीही याच कारणास्तव पुरस्कार वितरण झाले नव्हते. यंदा अजून कालावधी आहे. राज्य सरकारकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर ऑगस्टपूर्वी अर्ज मागवून पुरस्कार वितरण होऊ शकते. आम्ही आशावादी आहोत.’’

दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कार वितरण सोहळा शेवटच्या वेळेस २९ ऑगस्ट २०१८ रोजी झाला होता. तेव्हा क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकरसरदेसाई यांच्या पत्नी नंदिनी यांच्या उपस्थितीत भारतीय महिला क्रिकेट संघातील हुकमी खेळाडू शिखा पांडे हिला पुरस्कारांतर्गत २ लाख रुपयेप्रशस्तिपत्रक आणि दिलीप सरदेसाई यांचा अर्धाकृती ब्राँझ पुतळा प्रदान करण्यात आला होता. मात्र मागील दोन वर्षे हा पुरस्कार क्रीडा खात्याचा कपाटात बंद आहे.

 पहिला पुरस्कार तपापूर्वी

मडगाव येथे जन्मलेले दिग्गज फलंदाज दिलीप सरदेसाई यांचे क्रिकेट मुंबईत बहरले.  १९६१ ते १९७२ या कालावधीत ते भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले. त्यांनी ३० कसोटी सामन्यांत त्यांनी ५ शतकांच्या साह्याने २००१ धावा केल्या. २ जुलै २००७ रोजी ६७व्या वाढदिवासास महिनाभराचा कालावधी असताना त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यानंतर या महान गोमंतकीय सुपूत्रास श्रद्धांजली वाहताना तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राज्य सरकारतर्फे दरवर्षी दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कार देण्याची घोषणा केली व २००८-०९ पासून हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोव्याच्या यशस्वी क्रीडापटूस दिला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू महेश गवळी हा या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला.

 दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्काराचे मानकरी

विजेता खेळ वर्ष

महेश गवळी फुटबॉल २००८-०९

क्लायमॅक्स लॉरेन्स फुटबॉल २००९-१०

तलाशा प्रभू जलतरण २०१०-११

भक्ती कुलकर्णी बुद्धिबळ २०११-१२

समीर नाईक फुटबॉल २०१२-१३

क्लिफर्ड मिरांडा फुटबॉल २०१३-१४

नताशा पाल्हा टेनिस २०१४-१५

आनंद पंडियाराजन तायक्वांदो २०१५-१६

शिखा पांडे क्रिकेट २०१७-१८

संबंधित बातम्या