मुरली विजयला पाहताच चाहते ओरडू लागले, 'DK... DK...,' Video Viral

Murali Vijay: मुरली विजय रुबी तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) 2022 मध्ये त्रिची वॉरियर्सकडून खेळत आहे.
Murali Vijay
Murali VijayDainik Gomantak

Ruby Tamil Nadu Premier League: मुरली विजय रुबी तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) 2022 मध्ये त्रिची वॉरियर्सकडून खेळत आहे. या स्पर्धेसह मुरली विजय प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात उतरला आहे. मुरली सध्या फलंदाजीमुळे चर्चेत आहे. त्याशिवाय मुरली आणखी एका गोष्टीमुळेही खूप चर्चेत आला आहे.

वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुरली विजय (Murali Vijay) वॉरियर्सच्या बाजूने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याचवेळी काही चाहते अचानक 'डीके...डीके...' म्हणून ओरडायला लागतात.

Murali Vijay
ICC क्रमवारीत टीम इंडियाची कामगिरी, इशान किशनसह दिनेश कार्तिकचीही मोठी झेप

दुसरीकडे, व्हिडीओमध्ये मुरली विजय चाहत्यांच्या प्रतिक्रीयेवर पहिल्यांदा टाळ्या वाजवतो. त्यानंतर चाहते शांत होत नाहीत असे जेव्हा त्याला समजते तेव्हा तो त्यांना हात जोडतो. हा व्हिडिओ TNPL 2022 च्या सीझनमधील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Murali Vijay
ICC Rankings मध्ये टीम इंडियाचा जलवा, या बाबतीत ठरली जगातील पहिली टीम

शिवाय, निकिता आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांचा 2012 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर लगेचच मुरली विजय आणि निकिता यांनी लग्न केले. मुरली विजयला अशा ट्रोलिंगचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला अनेकदा ट्रोल केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com