क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात 'स्लो' गतीने टाकलेला चेंडू माहीतीयं का?

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

न्यूझीलंडची महिला गोलंदाज लेह कास्पार्कने 38 किलोमीटर प्रती तास वेगाने चेंडू टाकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.

सध्या क्रिकेटमधील नियम हे फलंदाजांच्या बाजूने अधिक बळकट झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता गोलंदाजांना उत्तम कामगिरी करण्यासाठी अधिक झगडावं लागत. फलंदाजांवर वचक ठेवण्यासाठी गोलंदाजांना  सतत  नवीन काहीतरी करावं लागत आहे. गतीमध्ये बदल करत राहणे, उलट्या हाताने चेंडू टाकणे, नकल चेंडू टाकणे असे अनेक प्रकार  गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत.

अनेक वेळा वेगवान गोलंदाजांसोबत फिरकी गोलंदाजही अशा प्रकारचे चेंडू टाकताना दिसले आहेत. परंतु मैदानावर आता असं काहीतरी घडलं आहे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार क्वचितच आपल्याला पहायलं मिळतं. न्यूझीलंडची महिला गोलंदाज लेह कास्पार्कने 38 किलोमीटर प्रती तास वेगाने चेंडू टाकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. फलंदाजाला चकवा देण्यासाठी लेह कास्पार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कमी गतीचा चेंडू टाकला. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये लेह कास्पर्काने ही कामगिरी केली आहे. (Do you know the ball that was bowled at the slowest pace in the history of cricket)

माजी क्रिकेटपटू लक्ष्मणची सोशल मिडियावर ‘दिल छु जाने वाली’ पोस्ट

ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान आठव्या षटकात कास्पार्कने हा चेंडू टाकला. ऑस्ट्रेलियन फलंदाज बेथ मूनीने लेह कास्पार्कच्या चेंडूवर अधिक सावध फलंदाजी करत एक धाव घेतली. कास्पार्कने टाकलेला चेंडू सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द पार पडलेल्या तिसऱ्या एकदीवसीय सामन्यात लेह कास्पार्कने 24 धावा देत 3 बळी घेतले. 
 

संबंधित बातम्या