Goa University: आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक स्पर्धा; डॉन बॉस्को, केपे महाविद्यालय सांघिक विजेते

स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील एक हजाराहून जास्त ॲथलिट सहभागी झाले होते.
Inter college Athletic
Inter college AthleticDainik Gomantak

Goa University 35 th Inter college Athletic Competition: गोवा विद्यापीठाच्या 35व्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक स्पर्धेत पुरुष गटात पणजीतील डॉन बॉस्को महाविद्यालयाने, तर महिलांत केपे सरकारी महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद मिळविले. स्पर्धा बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाली.

स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील एक हजाराहून जास्त ॲथलिट सहभागी झाले होते. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच फोटो फिनिश तंत्रज्ञानाचा वापर झाला.

Inter college Athletic
Ind Vs Aus Test: शुभमन! अख्खं नागपूर बोलतंय, आतातरी बघं; उमेश यादवच्या ट्विटची सर्वत्र चर्चा

स्पर्धेचे उद्‍घाटन पिलारच्या फादर आग्नेल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. सावियो फालेरो यांच्या हस्ते झाले. यावेळी मिल्टन फर्नांडिस यांची उपस्थितीत होती. बक्षीस वितरण गोव्याचे ‘पद्मश्री’ फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्या हस्ते झाले.

सर्वसाधारण गटात पुरुष विभागात डॉन बॉस्को महाविद्यालयास अव्वल स्थान मिळाले. नावेली येथील रोझरी महाविद्यालयास उपविजेतेपद, तर केपे सरकारी महाविद्यालयास तिसरा क्रमांक मिळाला. महिलांत केपे सरकारी महाविद्यालयास विजेतेपद, म्हापशाच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयास उपविजेतेपद, तर आसगावच्या ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयास तिसरा क्रमांक मिळाला.

Inter college Athletic
Dabolim Airport: व्हिलचेअरसाठी खंडणी! दाबोळीवर इंग्लंडच्या दिव्यांग ज्येष्ठ महिलेसोबत गैरव्यव्हार, तक्रार दाखल

टेडी कार्दोझचा स्पर्धा विक्रम

डॉन बॉस्को महाविद्यालयाचा टेडी कार्दोझ याने पुरुषांच्या 5,000 मीटर शर्यतीत स्पर्धा विक्रम नोंदविला. त्याने हे अंतर 14 मिनिटे 50.95 सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदकाचा मान मिळविला.

मोझेस, कुनिका सर्वोत्तम ॲथलिट

केपे सरकारी महाविद्यालयाचा मोझेस मास्कारेन्हास पुरुष गटात, तर आसगाव येथील डीएम्स महाविद्यालयाची कुनिका हरमलकर स्पर्धेतील सर्वोत्तम ॲथलिट ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com