Goa: भारतीय फुटबॉल दर्जा चव्हाट्यावर

खेळाडू व संघांनी मनात धास्ती ठेवून सामन्यासाठी मैदानावर पाऊल ठेवले. एकंदरीत, भारतीय फुटबॉल (Indian football) दर्जा सुधारण्यासाठी अजून भरपूर मजल गाठण्याची आहे हे सिद्ध झाले.
Goa: भारतीय फुटबॉल दर्जा चव्हाट्यावर
ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेला (Durand Cup football tournament) पावसाचा तडाखा बसला आणि तेथील मैदानांची दयनीय स्थिती, तसेच एकंदरीत दर्जा चव्हाट्यावर आला. Dainik Gomantak

आयएसएल फुटबॉल स्पर्धेमुळे (ISL football tournament) भारतीय फुटबॉल (Indian football) वलयांकित वाटत असले, तरी प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. साधनसुविधांत भारतीय फुटबॉल अजूनही खूप मागे आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता (Kolkata) व कल्याणी येथे सुरू असलेल्या 130 व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेला (Durand Cup football tournament) पावसाचा तडाखा बसला आणि तेथील मैदानांची दयनीय स्थिती, तसेच एकंदरीत दर्जा चव्हाट्यावर आला. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी एफसी गोवा (FC Goa), तसेच दिल्ली एफसी (Delhi FC) संघाने खराब मैदानावर खेळण्याऐवजी माघार घेण्याचा विचारही व्यक्त केला, सुदैवाने तसे काही झाले नाही. खेळाडू व संघांनी मनात धास्ती ठेवून सामन्यासाठी मैदानावर पाऊल ठेवले. एकंदरीत, भारतीय फुटबॉल दर्जा सुधारण्यासाठी अजून भरपूर मजल गाठण्याची आहे हे सिद्ध झाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com