AFC Champions League: कोरोनामुळे एफसी गोवाचे परदेशी खेळाडू तातडीने मायदेशी रवाना

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

स्पर्धेतील दोन यलो कार्डमुळे निलंबित असलेला गोन्झालेझ याचा अपवाद वगळता इतर तिन्ही परदेशी खेळाडू एफसी गोवाच्या गुरुवारच्या लढतीत खेळणे अपेक्षित होते.

पणजी:  भारतातील कोविड विषाणू महामारी बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे स्पेनकडून संभाव्य प्रवास निर्बंध आणि विलगीकरण प्रक्रियेच्या धास्तीने एफसी गोवा संघातील सर्व परदेशी आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील एक सामना बाकी असताना बुधवारी रात्री उशिरा तातडीने मायदेशी रवाना झाले.``भारतातील प्रवासासंदर्भात युरोपियन आणि इतर देशांनी घेतलेल्या ताज्या धोरणानुसार पूर्व-प्रभावी उपायांतर्गत मुख्य प्रशिक्षक आणि स्टाफ यांच्यासह आमच्या परदेशी तुकडीस मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे,`` असे एफसी गोवा क्लबने गुरुवारी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. (Due to the corona, the foreign players of FC Goa were immediately repatriated)

AFC Champions League: एफसी गोवासाठी प्रतिष्ठेची लढत; अल वाहदा क्लबचे खडतर आव्हान

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या ई गटात एफसी गोवाचा शेवटचा साखळी सामना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबविरुद्ध होणार आहे, त्यापूर्वीच सर्व परदेशी सुरक्षिततेच्या कारणास्तव रवाना झाल्यामुळे आता एफसी गोवाचा पूर्ण भारतीय संघ शेवटच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल. सध्या ई गटात इराणचा पर्सेपोलिस एफसी (12 गुण) अव्वल असून अल वाहदा (10 गुण) संघ दुसऱ्या स्थानी आहे. एफसी गोवा तीन गुणांसह तिसऱ्या, तर कतारचा अल रय्यान दोन गुणांसह तळाच्या चौथ्या स्थानी आहे. ई गटातील शेवटची फेरी गुरुवारी रात्री खेळली जाईल.

प्राप्त माहितीनुसार, नवी दिल्ली येथून रवाना झालेल्या विमानात एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो, तंदुरुस्ती प्रशिक्षक हावी गोन्झालेझ, खेळाडूंत कर्णधार एदू बेदिया, होर्गे ओर्तिझ, इव्हान गोन्झालेझ हे स्पॅनिश, तसेच ऑस्ट्रेलियन जेम्स डोनाकी या परदेशींचा समावेश आहे. स्पर्धेतील दोन यलो कार्डमुळे निलंबित असलेला गोन्झालेझ याचा अपवाद वगळता इतर तिन्ही परदेशी खेळाडू एफसी गोवाच्या गुरुवारच्या लढतीत खेळणे अपेक्षित होते. एफसी गोवा क्लबचे हे परदेशी आपल्या मायदेशी तातडीने  रवाना झाले नसते, तर संभाव्य निर्बंधामुळे ते आणखी किमान एक महिना गोव्यात अडकले असते, असे सूत्राने सांगितले. गुरुवारच्या लढतीने एफसी गोवाचा 2020-21 मोसम संपत आहे. खेळाडू व प्रशिक्षक विनाकारण गोव्यात अडकू नयेत या कारणास्तव एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने त्यांना निघण्यास परवानगी दिल्याचे सूत्राने नमूद केले. 

IPL 2021: एबी डिव्हिलियर्सच्या नावावर नवीन विक्रम 

 

संबंधित बातम्या