पावसाच्या व्यत्ययामुळे गोव्याला दोन गुणांवर समाधान मानावे लागले

विनू मांकड करंडक 19 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात गोव्याला पावसामुळे पुन्हा एकदा दोन गुणांवर समाधान मानावे लागले.
पावसाच्या व्यत्ययामुळे गोव्याला दोन गुणांवर समाधान मानावे लागले
Goa Sports: त्रिपुराविरुद्धचा सामना अहमदाबादमधील पावसामुळे अपूर्णDainik Gomantak

Panjim: विनू मांकड करंडक 19 वर्षांखालील (19 Years) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या (Cricket competitions) एलिट क गटात गोव्याला पावसामुळे पुन्हा एकदा दोन गुणांवर समाधान मानावे लागले. अहमदाबाद येथील पावसामुळे त्यांचा त्रिपुराविरुद्धचा सामना अपूर्ण राहिला.

Goa Sports: त्रिपुराविरुद्धचा सामना अहमदाबादमधील पावसामुळे अपूर्ण
'स्वच्छ भारत अभियाना'निमित्त 'वास्कोत' स्वच्छता मोहिम

गोवा व त्रिपुरा यांच्यातील सामना शनिवारी अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज मैदानावर सुरू झाला. त्रिपुराने 5 बाद 54 वरून निर्धारित 50 षटकांत 9 बाद 175 धावांची मजल मारली. नंतर उपाहाराच्या कालावधीत जोरदार पावसामुळे मैदान प्रभावित झाल्यामुळे गोव्याच्या डावाला सुरवात होऊ शकली नाही आणि सामना पुढे सुरू होण्याची शक्यता नसल्याने पंचांनी लढत थांबविण्याचा आणि दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण देण्याचा निर्णय घेतला, असे गोवा संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Goa Sports: त्रिपुराविरुद्धचा सामना अहमदाबादमधील पावसामुळे अपूर्ण
Goa:'भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी गांधी मार्गाचा अवलंब करा'

गोव्याचे आता स्पर्धेतील चार लढतीतून आठ गुण झाले आहेत. मुंबईविरुद्धचा पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. नंतर गोव्याने आसामला नमविले, तर हैदराबादविरुद्ध पराभव पत्करावा लागला. गोव्याचा स्पर्धेतील शेवटचा सामना राजस्थानविरुद्ध होईल.

मुलींच्या लढतीवरही पाणी

नागपूरमधील पावसामुळे 19 वर्षांखालील मुलींच्या एलिट ब गटातील गोवा व झारखंड यांच्यातील एकदिवसीय सामना शनिवारी एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. हा सामना लेडी अमृतबाई डागा कॉलेज मैदानावर होणार होता. दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण मिळाले. सलग दोन सामने गमावल्यानंतर गोव्याला या निकालामुळे गुणतक्त्यात खाते खोलता आले.

Related Stories

No stories found.