आयएसएल स्पर्धेत ईस्ट बंगालने गतविजेत्यांना गोलशून्य रोखले

त्यामुळे अव्वल स्थानाची आघाडी वाढविण्याची त्यांची संधी हुकली.
आयएसएल स्पर्धेत ईस्ट बंगालने गतविजेत्यांना गोलशून्य रोखले
ISL East BengalDainik gomantak

पणजी : ईस्ट बंगालचा अनुभवी गोलरक्षक, कर्णधार अरिंदम भट्टाचार्य याचे अफलातून अभेद्य गोलरक्षण, तसेच बचावपटूंची सातत्यपूर्ण दक्षता यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी रात्री मुंबई सिटीचा अपेक्षाभंग झाला. गतविजेत्यांना वास्को येथील टिळक मैदानावर गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले, त्यामुळे अव्वल स्थानाची आघाडी वाढविण्याची त्यांची संधी हुकली.

गतमोसमात एटीके मोहन बागानतर्फे खेळताना अरिंदम आयएसएल (ISL) स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक ठरला होता. आता ईस्ट बंगालतर्फे खेळताना शुक्रवारी पुन्हा एकदा त्याने ‘गोलनेट’समोर लाजबाव कामगिरी प्रदर्शित केली, त्यामुळे धारदार आक्रमणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई सिटीला फक्त एकाच गुणावर समाधान मानावे लागले.

ISL East Bengal
विराटच्या फलंदाजीची ऑस्ट्रेलियन चॅनलने उडवली खिल्ली, वसीम जाफरने घेतला क्लास!

आता सलग चार लढतीत त्यांना फक्त दोनच गुण मिळाले आहेत. त्यामुळे अग्रस्थानाच्या आघाडीवर मर्यादा आल्या आहेत. मुंबई सिटीची ही 10 लढतीतील दुसरी बरोबरी आहे. त्यांचे 17 गुण झाले असून पुन्हा अग्रस्थान मिळाले आहे, मात्र त्यांच्या मागोमाग असलेल्या हैदराबाद एफसी व जमशेदपूर एफसीचे प्रत्येकी 16 गुण आहेत, त्यामुळे मुंबई (Mumbai) सिटीचे अव्वल स्थान जास्त काळ टिकण्याची शक्यता कमीच आहे. स्पर्धेत आठ गोल केलेला मुंबई सिटीचा हुकमी आघाडीपटू इगोर आंगुलो याला ईस्ट बंगालच्या बचावफळीने मोकळीक दिली नाही.

ISL East Bengal
चेन्नईयीनचे आव्हान; एफसी गोवासाठी आयएसएलमध्ये कठीण सामना

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू रेनेडी सिंग हे ईस्ट बंगालचे अंतरिम प्रशिक्षक (Instructor) आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालील खेळणाऱ्या ईस्ट बंगालने सलग दुसऱ्या लढतीत बरोबरीचा एक गुण प्राप्त केला. पाच लढतीतील त्यांची ही चौथी बरोबरी आहे. कोलकात्याचा संघ 10 सामने खेळूनही विजयाविना असला, तरी शुक्रवारी त्यांचा दक्ष बचाव अफलातून ठरला. स्पर्धेतील त्यांची ही एकंदरीत सहावी बरोबरी ठरली. सहा गुणांसह त्यांचे शेवटचे अकरावे स्थान कायम राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com