आज आयएसएलमध्ये मुंबई सिटीसमोर नवोदित ईस्ट बंगालचे आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या सातव्या मोसमातील मुंबई सिटी एफसीची सुरवात तेवढी दणकेबाज झालेली नाही. आज त्यांच्यासमोर ईस्ट बंगालचे आव्हान असेल.

पणजी  :  इंडियन प्रीमियर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या सातव्या मोसमातील मुंबई सिटी एफसीची सुरवात तेवढी दणकेबाज झालेली नाही. आज त्यांच्यासमोर ईस्ट बंगालचे आव्हान असेल. प्रतिस्पर्धी नवोदित असला, तरी सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला सावधच राहावे लागेल.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. मागील सामन्यात मुंबई सिटीने एफसी गोवास निसटते नमविले. गोव्यातील संघाचा एक खेळाडू कमी झाल्यानंतर सामन्याच्या इंज्युरी टाईममधील पेनल्टी गोलमुळे मुंबईच्या संघास पूर्ण तीन गुण मिळाले. यंदाच्या आयएसएल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालने अगोदरच्या लढतीत एटीके मोहन बागानला पूर्वार्धात झुंजविले, पण नंतर दोन गोल स्वीकारल्यामुळे त्यांच्या मोहिमेची सुरवात पराभवाने झाली.

ईस्ट बंगालने एटीके मोहन बागानविरुद्धच्या कोलकाता उल्लेखनीय खेळ केला होता, त्यामुळे मुंबई सिटीस गाफील राहता येणार नाही. मुंबई सिटीस गोल करण्यात झगडावे लागले आहे. दोन लढतीत त्यांनी फक्त एकच गोल नोंदविला आहे. ही बाब लोबेरा यांना निश्चितच सतावत असेल. एटीके मोहन बागानविरुद्धच्या पराभवानंतर फावलर यांनी आपल्या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले होते व संघ नवा असला, तरी प्रगती साधू शकतो असे नमूद केले होते. 

 

अधिक वाचा :

अपराजित नॉर्थईस्ट युनायटेडने  एफसी गोवाला 1-1 फरकाने रोखले; एफसी गोवा अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत 

संबंधित बातम्या